उपराष्ट्रपतींच्या हस्ते नव्या संसद भवनात फडकला तिरंगा
17-Sep-2023
Total Views |
नवी दिल्ली : सोमवारपासून संसदेचे विशेष अधिवेशन चालू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याहस्ते नवीन संसदेच्या गेटवर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन, पीयूष गोयल, अर्जुन राम मेघवाल, काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी आणि प्रमोद चौधरी हे उपस्थित होते.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी हा प्रसंग ऐतिहासिक असल्याचे विधान केले. उपराष्ट्रपती म्हणाले की, "हा एक ऐतिहासिक क्षण आहे. भारत युगाच्या बदलाचा साक्षीदार आहे. जग भारताची शक्ती आणि योगदान पूर्णपणे ओळखत आहे. आपण अशा काळात जगत आहोत जिथे आपण विकास, यश पाहत आहोत."
ध्वजारोहण समारंभात बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, "पंतप्रधान मोदींना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार न करता थेट गरिबांना योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.