ठासरा येथे शिवयात्रेवर कट्टरपंथींची दगडफेक; १७ कट्टरपंथींविरोधी FIR दाखल!

    16-Sep-2023
Total Views |
Kheda stone pelting on Shiv Yatra

गांधीनगर : गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील ठासरा येथे दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी श्रावणाच्या शेवटच्या दिवशी आयोजित केलेल्या भगवान शिव यात्रेवर कट्टरपंथींनी हल्ला केला. ही यात्रा मदरशाजवळून जात असताना हा हल्ला करण्यात आला आणि शिवयात्रेवर अचानक दगडफेक सुरू झाली, त्यामुळे गोंधळ उडाला आणि पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. आता पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली आहे.

या घटनेच्या संदर्भात ठासरा पोलिस ठाण्यात तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.डीजे घेऊन निघालेल्या मिरवणुकीवर कट्टरपंथ्यांनी कसा कसा हल्ला केला हे एफआयआरमध्ये नमुद करण्यात आले आहे.या प्रकरणी ठासरा पोलिसांनी विजय परमार नावाच्या तरुणाच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केला आहे. त्यात दरवर्षीप्रमाणे याही वेळी श्रावण महिन्याच्या शेवटी दि. १५ सप्टेंबर रोजी भगवान शंकराची मिरवणूक काढण्यात आली, त्यासाठी कायदेशीर मान्यताही घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरवर्षी ही यात्रा नागेश्वर महादेव मंदिरापासून सुरू होऊन बाघी, बलियादेव मंदिर, राम चौक, टॉवर बाजार, हुसैनी चौक, होळी चकला, तीनबत्ती, आशापुरी मंदिरात शंकराची मूर्ती ठेवून परत नागेश्वर मंदिरात येते.मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकरा वाजता यात्रेला सुरुवात झाली असून, ठासराआणि आसपासच्या गावातील सुमारे १ हजार हून अधिक भाविक यात सहभागी झाले होते. ज्यामध्ये पुरुष, महिला आणि लहान मुले सर्वांचा समावेश होता. यात्रेसाठी दोन डीजे मागविण्यात आले असून संपूर्ण मार्गावर ठासरा पोलीस ठाण्यातून आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. नागेश्वर महादेव मंदिरापासून सुरू झालेली यात्रा बलीदेव मंदिर, राम चौक, टॉवर बाजार, हुसैनी चौक, होळी चकला मार्गे ठरलेल्या मार्गाने दुपारी साडेतीनच्या सुमारास तीनबत्ती येथे पोहोचली.

 
दरम्यान या डीजेच्या माध्यामातून भक्तिगीते वाजत होती. पण तक्रारीत असे म्हटले आहे की, तीनबत्ती चौकातील मदरशाजवळ मिरवणूक पोहोचली तेव्हा ठासरा नगरपालिकेचे सदस्य मोहम्मद अबरार रियाझुद्दीन सय्यद, अस्पाक माजिम्मियाँ बेलीम आणि इतर सुमारे पन्नास मुस्लिम समाजाचे लोक मिरवणुकीजवळ आले आणि त्यांनी आयोजकांना सांगितले, “हमारा मदरसा बगल में है, अपना डीजे बजाना बंद करो।” आणि असे म्हटल्यावर डीजे बंद करून मारहाण करण्यात आली.तसेच एफआयआरमध्ये म्हटल्याप्रमाणे, जेव्हा हे लोक परतत होते तेव्हा मदरशाच्या छतावर आणि जवळच्या घरांवर जमलेले कट्टरपंथ्यांनी मिरवणुका बंद करण्यासाठी घोषणा बाजी केली. आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर मिरवणुकीवर दगडफेक सुरू झाली.

दरम्यान, मिरवणुकीसोबत असलेले पोलीस कर्मचारी आणि यात्रेतील नेत्यांनी दगडफेक थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र संतप्त कट्टरपंथी जमावाने दगडफेक थांबवली नाही. त्यामुळे ठासरा पोलीस ठाण्याचे अनेक पोलीस कर्मचारी व यात्रेत सहभागी असलेले अनेक जण जखमी झाले. त्यानंतर जेव्हा परिस्थिती चिघळली तेव्हा इतर पोलिसांचा ताफाही घटनास्थळी पोहोचला, ते पाहून दगडफेक करणारे लोक मदरसा आणि जवळपासच्या घरांच्या छतावरून पळून गेले.

दरम्यान ठासरा येथील शिवयात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर या प्रकरणात एकूण १७ मुस्लिमांची नावे असून उर्वरित ५० मुस्लिमांवर कलम १४३, १४७, १४८, १४९, १५३अ, २९५अ, ३२३, ३२४, ५०४, ५०५,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठासरा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.


मुहम्मद अबरार रियाज़ुद्दीन सैयद

अस्पाक मजिम्मियान बेलीम

ज़ैद अली मुहम्मद अली सैयद
 
अतीक मालेक

अहद सैयद

हारून पठान

रुकमुद्दीन रियाकतअली सैयद

फ़िरोज़ मजीत खान पठान

इदरीश

नावेद

जुनैद
 
 
तनवीर सैयद
  
फैजान सैयद

फ़ोम बैटरी

जाबिर खान इनायत खान पठान

मुर्गा
 
अल्ताफ खान मुख्तयार खान पठान
 
 


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.