भुवनेश्वर : केआयआयटी (KIIT) आणि केआयएसएसचे (KISS) या दोन्ही विभागातील चौदा उत्कृष्ट विद्यार्थी दि. 23 सप्टेंबर ते दि. 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणार्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या क्रीडा प्रकारात या प्रतिभावान व्यक्ती आंतरराष्ट्रीय मंचावर आपले कौशल्य दाखवतील. केआयआयटी (KIIT) आणि केआयएसएस (KISS) ही भारतातील एकमेव शैक्षणिक संस्था आहे. जिने आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक खेळाडू पाठवले आहेत.
यामध्ये तलवारबाजीच्या महिला सेबर आणि टीम सेबर इव्हेंटमध्ये भवानी देवी, पुरुष हॉकीत अमित रोहिदास, जलतरणध्ये साजन प्रकाश, महिलांच्या लाईटवेट डबल स्कल रोईंग स्पर्धेत अंशिका भारती, ऍथलेटिक्समध्ये प्रियांका महिलांच्या 20 किमी रेस वॉकमध्ये तर संदीप कुमार, किशोर जेना आणि तेजिंदर पाल हे पुरुषांच्या 20 किमी रेस वॉकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. रग्बी सातच्या महिला संघासाठी, डुमुनी मार्डी, तरुलता नाईक, मामा नाईक आणि हुपी माझी यांनी स्थान पक्के केले आहे. तेजस्वीन शंकर डेकॅथलॉनमध्ये आणि अमलन बोरगाहेन अॅथलेटिक्समध्ये 200 मीटर स्पर्धेतस्प्रिंट करेल, अशी माहिती डॉ. गगनेंदू डॅश (डीजी स्पोर्ट्स, KIIT) यांनी दिली.
क्रीडापटूंचे अभिनंदन करताना, ‘केआयआयटी’ आणि ‘केआयएसएस’चे संस्थापक डॉ. अच्युता सामंता म्हणाले की, हे खेळाडू ‘केआयआयटी’ आणि ‘केआयएसएस’साठीच नव्हे, तर संपूर्ण ओडिशासाठी अभिमानाचे कारण आहेत.