आजपासून RR केबलचा IPO गुंतवणुकीसाठी खुला

    13-Sep-2023
Total Views |
 
 
आजपासून RR केबलचा IPO गुंतवणुकीसाठी खुला
 
मुंबई:आजपासून RR केबलचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी गुंतवणूकदारांना खुला होणार आहे.आज १३ सप्टेंबर पासून १५ सप्टेंबर पर्यंत हा आयपीओ खुला राहील.Price Band ९८३ ते १०३५ रुप नये प्रति शेअर्स ठेवण्यात आला आहे.अँकर गुंतवणूकदारांसाठी (Institutional Investors) ला मंगळवार पर्यंत बिडींगसाठी मुदत होती.
 
 
१,७३९,१३१ शेअर्सचा फ्रेश इश्यू करण्यात आला आहे.ज्यामध्ये त्यांचे मुल्य १८० कोटींच्या घरात आहे.१७८४ कोटींचे शेअर्स मात्र Offer For Sale ( OFS) साठी राखीव गुंतवणूकीसाठी ठेवलेले आहेत.कमीत कमी १४ शेअर्सची खरेदी करता येईल व पुढे १४ शेअरचा संचात व्यवहार करता येतील.
 
 
RR केबल ही भारतातील इलेक्ट्रिकल क्षेत्रात आघाडीची कंपनी आहे.मार्च ३१ पर्यंत केबल वायर मार्केट मध्ये ५ टक्के मार्केट शेअर आर आर केबलचा होता.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.