मुंबई : मागील काही दिवसांत गगनाला भिडलेले टमाटरचे भाव अचानक घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी मुंबईतील वाशी एपीएमसी मंडईत 5 ते 10 रुपये प्रतिकिलो दराने टमाटर विकले गेल्याचे सांगण्यात येत आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यादरम्यान टमाटरच्या दराने उच्चांकी स्तर गाठला होता. या काळात टमाटरचा ठोक दर 150 रुपये प्रतिकिलो तर किरकोळ दर 200 रुपये प्रतिकिलो एवढा होता. तसेच यावेळी केंद्र सरकारने नेपाळहून 10 टन टमाटरची आयात करण्याचा निर्णय घेतला होता.
परंतू, ऑगस्टच्या शेवटी टमाटरचे उत्पादन वाढले आणि अचानक भाव घसरले. वाशी एपीएमसी बाजारात मागील आठवड्यात 12 ते 14 रुपये प्रतिकिलो दराने विकल्या गेलेल्या टमाटरचे दर सोमवारी 5 ते 10 रुपये प्रतिकिलोवर येऊन थांबले. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.