Stock Market Updates - निफ्टी इंडेक्स ' स्काय रॉकेट ' प्रथमच २०००० इंडेक्स पार
मुंबई:' डंके की चोट पे 'अनुभूती देणारा एनएससी ने थेट २०००० पार पूर्णांकाने वर जात नवा रेकॉर्ड बनवला आहे. एकेकाळच्या बीएसी मक्तेदारीला चैलेंज देत आपली ओळख बनवताना निफ्टी ५० २०००० पार गेल्यामुळे इक्विटी मार्केटमध्ये खुषीचे वातावरण दिसून आले. यावेळी ANI चा वृत्तानुसार NSE मध्ये लोकांनी २०००० पार केल्यामुळे घंटा वाजवून आनंद व्यक्त केला आहे.
अन्नधान्य महागाई, वाढलेला रूपया,आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरता यावर मात करत गेले काही दिवस मार्केट तेजीत दिसून आले. मागच्या आठवड्यात निफ्टी ढोबळमानाने २ टक्के इतका वाढला होता. काल क्लोजिंग बेलनंतर १९८१९.९५ चा इंडेक्स १८० पूर्णांकांने आज वधारला.गेल्या सहा महिन्यांत मार्केट १६ टक्यांपर्यंत वधारले असल्याचे पाहिला मिळाले.आज अदानी पोर्टस,अदानी एटंरप्राईस, पॉवर ग्रीड,अपोलो हॉस्पिटल,एक्सिस बँक हे शेअर्स तेजीत दिसून दुसरीकडे मात्र कोल इंडिया,ओएनजीसी,बजाज फायनान्स,एल अँड टी, इंडसइंड शेअर्सचे मूल्य घसरलेले पाहायला मिळाले.