६ जून ला महानिर्मिती वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
04-Jun-2023
Total Views | 88
1
मुंबई : ६ जून शिवराज्याभिषेक दिनी महानिर्मितीचा १८ वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यस्तरीय विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच वर्ष २०२१-२०२२ मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल शक्तीपुंज, यांत्रिकोत्तम,ब्लॅक डायमंड, विश्वकर्मा सारखे अन्य काही पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते रंगशारदा सभागृह, लीलावती हॉस्पिटल जवळ, वांद्रे पाश्चिम येथे संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रम ६ जून रोजी दुपारी ४ ते ६.३० या दरम्यान संपन्न होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० सांगीतिक कार्यक्रम तर स्नेहभोजन रात्री ८.३० वाजता नियोजित आहे.
मान्यवरांमध्ये आभा शुक्ला प्रधान सचिव(ऊर्जा), डॉ.पी.अनबलगन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, बाळासाहेब थिटे संचालक(वित्त), संजय मारुडकर संचालक(संचलन), विश्वास पाठक ( संचालक) , अभय हरणे संचालक(प्रकल्प) तसेच राजेश पाटील संचालक(खनिकर्म) प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तरी महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषणच्या अधिकारी- कर्मचारी आणि कुटुंबियांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे महानिर्मितीने कळविले आहे.