कान्हेरी अजून जिवंत आहे - डॉ. सूरज पंडित

    27-Jun-2023
Total Views | 33

kanheri
 
मुंबई : "नीट लक्ष देऊन ऐकलं आणि मन लावून बघितलं तर तिथली शांतता, निसर्ग, डोंगर, लेणी आजही आपल्याला त्यांच्या गोष्टी सांगताहेत असे कान्हेरीच्या भेटीला गेल्यावर वाटत असते. दोन हजाराहून अधिक वर्षे  रोड वरील 'ब्रम्हा कुमारी उद्यान' येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता.झाली कान्हेरी अजून जिवंत आहे." असे उद्गार विलेपार्ले येथील 'साठ्ये महाविद्यालयातील' (स्वायत्त) प्राचीन भारतीय संस्कृती विभागाचे प्रमुख, प्राध्यापक डॉ. सूरज पंडित यांनी काढले. ते गोष्ट आठवी: गोष्टी कान्हेरी लेण्यांच्या या कार्यक्रमात बोलत होते. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरीवली भाग व बोरीवली सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या इतिहास कट्टा: गप्पा इतिहासाच्या: गोष्टी माणसांच्या या उपक्रमांतर्गत सुरु असलेल्या साष्टीच्या गोष्टी हा कार्यक्रम बोरीवलीतील देवीदास लेन येथे संपन्न झाला. 
 
कान्हेरी लेणी हा विषय डाॅ. सूरज पंडित यांनी अतिशय उत्तम रीतीने मांडला. ते पुढे म्हणले, "कान्हेरी लेणी निर्माण करण्याची प्रेरणा देणाऱ्या भिक्खु संघाचा प्रभाव जवळजवळ सोळाशे वर्षे टिकून होता. बौद्ध धर्माच्या परंपरेतील अशा प्रकारचे हे एकमेव उदाहरण असावे. जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठात बौद्ध धर्माचे प्रगत शिक्षण घेण्याआधी कान्हेरीच्या विहारात मूलभूत व पायाभूत शिक्षण घेणे, हे महत्वाचे मानले जात असे."
 
कान्हेरीच्या लेण्यांशी संबंधित गोष्टी सांगताना त्यांनी अनेक विद्वान, लेखक, प्रवासी, व्यापारी, दानकर्ते, बौद्ध भिक्षूंच्या व त्यांच्या संघांच्या गोष्टी सांगितल्या. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांताचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मुंबईची संस्कृती तसेच इतिहास नव्या पिढीपर्यंत ओहोचवायला या माध्यमातून मदत होते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121