निवडणुका झाल्यास PM कोण होणार? सर्वेक्षण आले समोर..

    24-May-2023
Total Views |
who will be the PM?

नवी दिल्ली
: आज निवडणुका झाल्या तर पंतप्रधान पदासाठी लोकांची पंसती कोणाला असेल याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षासाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ४३ टक्के जनता पंतप्रधानपदासाठी मोदींना पहिली पसंती देत ​​असल्याचे सर्वेक्षणाचे आकडे सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूला २७ टक्के लोकांनी पंतप्रधानसाठी राहुल गांधी यांना पंसती दर्शवली आहे. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना या सर्वेक्षणात १ टक्के लोकांना पसंत केले आहे.

१० ते १९ मे दरम्यान १९ राज्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार ४३ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी मोदींना पहिली पसंती दर्शवली आहे. तर २७ टक्के लोक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बाजूने दिसले. विशेष म्हणजे या शर्यतीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ४ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.