“जैवविविधतेच्या दृष्टिकोणातुन महाराष्ट्रातील पश्चिम घाट अत्यंत समृद्ध”

जागतिक जैवविविधता दिनाच्या कार्यक्रमात केंद्रिय मंत्री भुपेंद्र यादव यांचे प्रतिपादन

    23-May-2023
Total Views |

Biodiversity day event

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील बीकेसी परिसरातील जिओ कॉनव्हेनशन सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या औचित्यावर आयोजित कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव, राज्य पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री आश्विनी कुमार चौबे आणि इतर मंत्री उपस्थित होते.


महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग आणि राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण यांच्या समन्वयातुन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रिय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय नवी दिल्लीच्या सचिव लीना नंदन यांच्यासह केंद्रिय मंत्री भुपेंद्र यादव आणि आश्विनी कुमार चौबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


“जैवविविधतेच्या दृष्टिकोणातुन महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा खऱ्या अर्थाने समृद्ध आहे. म्हणुनच महाराष्ट्रातील मुंबईमध्ये हा दिवस साजरा करताना आनंद होत आहे. यंदाचा ५ जुन रोजी येणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी घोषित केलेल्या मिशन लाईफच्या अनुशंगाने साजरा करणार आहोत”, असे मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव यांनी यावेळी व्यक्त केले.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.