कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या, शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रीपदावर बोळवण

    18-May-2023
Total Views |
Karnataka CM Announcement

नवी दिल्ली
: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या तर उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांची निवड करण्यात आली आहे. नव्या सरकारचा शपथविधी उद्या २० मे रोजी होणार आहे.
 
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने १३५ जागांसह बहुमत प्राप्त केले होते. त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यामधील तीव्र स्पर्धेनंतर सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची निवड करण्यात आली आहे.

काँग्रसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी पत्रकारपरिषदेत यांची माहिती दिली आहे. ते म्हणाले की,13 मे रोजी पक्षाला बहुमत मिळाले, 14 रोजी आमदारांची बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये काँग्रेस पक्षाने निरीक्षकांची नियुक्ती केली. काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष असून आमचा हुकूमशाहीवर विश्वास नाही. त्यामुळे सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २० मे रोजी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांसह नवे मंत्रिमंडळही शपथ घेणार असल्याचे वेणूगोपाल यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदावर बोळवण गेली असली तरी आपण नाराज नसल्याचे शिवकुमार यांनी सांगितले आहे. मात्र, त्यांचे बंधू आणि खासदार डी.के. सुरेश यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात सिद्धरामय्या यांची नाराजी व्यवस्थितपणे हाताळण्याचे आव्हान सिद्धरामय्या आणि काँग्रेस नेतृत्वास असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.