धुप पेटवताना स्टोव्हचा भडका उडुन महिला होरपळली

    23-Mar-2023
Total Views | 106
stove-fire


ठाणे
: घरात पुजेकरीता स्टोव्हवर धुप पेटवताना स्टोव्हचा भडका उडुन लागलेल्या आगीमुळे एक महिला होरपळल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दादोजी कोंडदेव स्टेडीयमसमोरील नागसेन नगरमधील ठाणे महापालिका चाळीत घडली. रेश्मा प्रविण जाधव (४१) असे होरपळलेल्या महिलेचे नाव असुन त्यांच्या हाताला व चेहर्‍याला जखम झाली आहे. त्यांना नजीकच्या दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे. दरम्यान, घटनास्थळी लागलेली आग आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी ४० मिनिटात विझवल्यान सुदैवाने अनर्थ टळला.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121