परवडणार्‍या घरांची स्वप्नपूर्ती करणारे 'किंग्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स'

    23-Mar-2023
Total Views |
kings builders and developers

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि महाराष्ट्रावर मराठ्यांचं अधिराज्य आलं. याच महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी, तर आपल्या भारत देशाची ती आर्थिक राजधानी बनली. विविध क्षेत्रातील उद्योगधंदे, कारखाने मुंबईचा अविभाज्य भाग बनले. त्यामुळे ठिकठिकाणाहून चाकरमानी, कामगार वर्ग मुंबईत दाखल झाला आणि मुंबई मायानगरी झाली. गरीब ते श्रीमंत सर्व स्तरातील लोकं इथे आपले हातपाय पसरू लागले. याच मायानगरीत आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं रंगवू लागले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत देशाने जवळपास सर्वच क्षेत्रात अत्युच्चम विकास साधला. जागतिकीकरणामुळे अनेक क्षेत्रांत क्रांती झाली. आधुनिकीकरणामुळे तांत्रिक विकासाबरोबर सर्वसामान्यांच्या गळ्याभोवती महागाईचा फासही आवळत गेला. दैनंदिन जीवन जगणे कठीण होऊ लागले. मग हक्काचे घर घेणे तर दुरापास्तच!
 
एकेकाळी मुंबई ही चाकरमान्यांची म्हटली जायची. पण हाच चाकरमानी आज आर्थिक अडचणींमुळे कुटुंबकबिल्यासह मुंबईपासून दूर जाऊन स्थिरावू लागला आहे. मराठी माणसाची नेमकी हीच दुखरी नस ओळखून, मुंबईतला मराठी माणूस मुंबईतच राहावा, यासाठी बांधकाम क्षेत्रातील एका मराठी उमद्या तरुणाने हिरीरीने धाडसी पाऊल उचलले आणि प्रत्येकाला स्वतःचे हक्काचे ‘बजेट होम’ देण्याचा चंग बांधला.‘किंग्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स!’चे सर्वेसर्वा डॉ. निलेश कुडाळकर यांनी सर्वसामान्यांच्या स्वप्नपूर्तीचे स्वप्न पाहिले आणि म्हाडा पुनर्विकास प्रकल्पापासून श्रीगणेशा करत इमारत पुनर्विकास क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवले. बांधकामाचा उत्कृष्ट दर्जा, प्रामाणिकपणा, उत्तम लोकसंपर्क यामुळे बघता-बघता कुर्ला, घाटकोपर, तळोजा, नाहूर, भांडूप, गोवंडी, चेंबूर येथील इमारत पुनर्विकासाची यशस्वी पूर्तता करत सध्या सायन, चुनाभट्टी, चेंबूर येथे सर्वसामान्यांसाठी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण’ (SRA) अंतर्गत महाप्रकल्प सुरू आहे आणि चार वर्षांच्या कालावधीत तो पूर्ण करण्यासाठी त्यांची दिवसरात्र धडपड सुरू आहे.


मुंबई ही जन्मभूमी असल्याने डॉ. निलेश कुडाळकर यांची या महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नाळ जुळली ती कायमचीच! मध्यमवर्गीय कुटुंबातील जन्म असल्याने बालपणापासूनच साधं, काटकसरी जीवन अनुभवलं. वडील जरी उद्योगक्षेत्रात यश प्राप्त करत होते, तरी आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्यांच्या, नातेवाईक मंडळींच्या व्यथा जवळून पाहिल्या, अनुभवल्या. संवेदनशील वडिलांमुळे इतरांच्या समस्या जाणून त्यांना सहकार्य करण्याच्या संस्काराचे बाळकडू घरातच मिळाले. त्यामुळेच आज मुंबईतील चाकरमान्यांच्या अपेक्षा, हित लक्षात घेऊन असंख्य अडीअडचणींवर मात करत डॉ. निलेश कुडाळकर यांनी इमारत पुनर्विकासाचे शिवधनुष्य उचलले आहे. विशेष म्हणजे मुदतीपूर्वीच ते इमारतीतील सदनिका धारकांना घराचा ताबा देतात.

बांधकाम व्यवसायाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना डॉ. निलेश कुडाळकर यांनी स्वकर्तृत्वावर या क्षेत्राचे आव्हान पेलले आणि शून्यातून वाटचाल करत ‘किंग्स बिल्डर्स आणि डेव्हलपर्स’चे विश्व उभे केले. कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा, जिद्द, चिकाटी यामुळेच सायन, चुनाभट्टी येथील ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण’ (SRA) हा प्रकल्प ते मुदतीपूर्वीच पूर्ण करतील, याची खात्री आहे. म्हणूनच सर्वसामान्यांच्या अपेक्षांना खरे उतरणारे प्रख्यात नाव म्हणजे ‘किंग्स बिल्डर्स आणि डेव्हलपर्स’चे सर्वेसर्वा डॉ. निलेश कुडाळकर, यात दुमत नाही.

मुंबई- सायन, चुनाभट्टी येथे गणेश चतुर्थी निमित्ताने खास सवलतीत ही घरे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होत आहेत.
 
वन रूम किचन - ४२ लाख (कार्पेट - २०३)
 
वन बेडरूम किचन - ५८ लाख (कार्पेट - २८८ )
 
वन बेडरूम किचन - ६२ लाख (कार्पेट - ३२०)

त्वरा करा. सवलत मर्यादित काळासाठी आहे. गणरायाच्या आशीर्वादाने आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची सुसंधी घेण्यासाठी आजच संपर्क करा.



संपर्क - ०७९६९२३३३३३


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.