भाषण सुरू असताना पवार समर्थकांची घोषणा, ठाकरेंनी कार्यकर्त्यांना खडसावले!

    15-Mar-2023
Total Views |

Uddhav Thackeray


मुंबई :
यशवंतराव चव्हाण केंद्रातील सभागृहात सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या भाषणावेळी पवार समर्थकांच्या घोषणाबाजीने गोंधळ उडाला. विशेष म्हणजे ही घोषणाबाजी उद्धव ठाकरेंच्या भाषण सुरू असतानाच झाल्याने आयोजकांची तारांबळ उडाली. यावर उद्धव ठाकरेंनीही सूचक प्रतिक्रीया देत वेळ सांभाळून घेतली. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील हा बेतालपणा उघड होण्याची ही काही पहिली वेळ नाही.

नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरे भाषण करत होते. भाजपसह एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर आसूड ओढण्यास सुरुवात केली होती. देशात लोकशाही टीकवायची आहे. त्यासाठी आपणच आमदार खासदारकी नगरसेवक पदांसाठी भांडत राहिलो तर देशातील लोकशाही संपुष्टात येईल, असे ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी विरोधीपक्षाचा सूर एकवटाला होता. ही बाब उपस्थित राष्ट्रवादीच्या नेत्यांना ही बाब खटकली.
 
शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. मात्र, उद्धव ठाकरेंनी निवडणूकांची रणनिती सांगतात. देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो, अशी घोषणाबाजी केले. घडला प्रकार लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. देशाचे नेते पवार साहेब आहेतच मात्र, एकी दाखवा भविष्यात आपणच एकमेकांच्या तंगड्यात तंगडी घालत राहिलो तर इथेच राहू. पुन्हा ते एकदा सत्तेत आले तर मात्र, लढणं अशक्य आहे, अशी समज उद्धव ठाकरेंना दिली.
 
ठाकरेंच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांची चुळबूळ


उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांची दबाक्या आवाज कुजबूज सुरूच होती. काँग्रेस-राष्ट्रवादीचे तुलनेने मोठ्या संख्येने कार्यकर्ते राज्यभरातून उपस्थित होते. शिवसेनेतील मुंबईतील वगळता अन्य जिल्ह्यातून कार्यकर्त्यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे आपापल्या नेत्यांची भाषणे आटोपल्यावर कार्यकर्त्यांची चुळबूळ सुरू झाली होती.

महाविकास आघाडी सभा घेणार!

उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या महाराष्ट्रभर सभा घेतल्या जाणार आहेत. महाविकास आघाडीचे सर्वच नेते यासाठी तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या जागा जिंकून आणण्याच्या दृष्टीने ही रणनिती आखली जाणार आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.