महापालिकेच्या शिक्षकांना वनवासी महिलांनी दिले हस्तकलेचे धडे

    15-Mar-2023
Total Views |
sevavivek


मुंबई
:मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे कार्यानुभवच्या तब्बल 100 शिक्षकांना पालघर मधील वनवासी महिलांनी बांबू हस्तकलेचे धडे दिले आहेत.सेवा विवेक सामाजिक संस्थेच्या प्रकल्प वर एक दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात बांबू हस्तकला कारागीर वनवासी महिलांनी सहभागी झालेल्या शिक्षकांना बांबू हस्तकलेपासून विविध गोष्टी बनवून दाखवल्या तसेच बांबू हस्तकलेचे विविध बारीक पैलू शिकवले.

शिक्षण विभाग मार्फत आलेल्या कार्यानुभवच्या शिक्षकांनी सेवा विवेकच्या बांबू हस्तकला कारागीर महिलांच्या कलेचे कौतुक केले तसेच अजून खूप कला शिकण्याची इच्छा बोलून दाखवली.या अभ्यास वर्गास प्रमुख मुख्य शिक्षण अधिकारी राजेश कानल आणि शिक्षण अधिकारी सुजाता खरे उपस्थित होते.सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील वनवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त व्हावा यासाठी सेवा विवेक ने पुढाकार घेतला आहे. अश्या महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जाते.
 
पालघर जिल्ह्यातील वनवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबू पासून उत्तम दर्जेदार पर्यावरणपूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे.उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी आहे. ह्या वर्षी महिलांनी बनवलेल्या राखी व आकाश कंदीलांना परदेशातूनही मागणी होती. तसेच वर्षभर महिला इतर वस्तू मोठ्या प्रमाणात तयार करतात यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे पेन होल्डर, मोबाईल होल्डर, पात्राधर, फिंगर जॉइंट ट्रे आदी सारख्या 36 बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार करतात.


या वस्तुंची सातत्याने होत असलेल्या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या रोजगार निर्मिती वर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. चांगला रोजगार प्राप्त होत असल्यामुळे महिला घरची जबाबदारी सांभाळून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देत आहेत.गेल्या वर्षी सेवा विवेकच्या कार्याचा माजी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांनीही कौतुक केले आहे. माजी राष्ट्रपती द्वारे हस्तकला प्रशिक्षित वनवासी महिलांचा सत्कार करण्यात आला.आज संस्थेतील अनेक प्रशिक्षण घेतलेल्या महिला ह्या संस्थेच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत तसेच नवीन महिलांना त्या प्रशिक्षण देत आहेत. या मुळेच वनवासी समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.