वाड्यात गाळे येथे रोटरी तर्फे हिंदू स्मशानभूमीची पुनर्बांधणी

    14-Mar-2023
Total Views | 93
 
Hindu Cemetery
 
वाडा : रोटरीने वाडा येथील गाळे गाव दत्तक घेतले आहे. गावातील स्मशानभूमी अतिशय जीर्ण अवस्थेत होती आणि त्यामुळे ती निरुपयोगी झाली होती. गावकऱ्यांनी तिच्या पुनर्बांधणीसाठी मदतीची विनंती केली होती. त्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ मुंबई वर्सोवाने वर्षाच्या सुरुवातीला प्रकल्प योजनांमध्ये त्याचा समावेश केला होता. क्लब सदस्यांना आवाहन केल्यावर, रोटेरियन अशोक गुप्ता आणि प्रगती गुप्ता या दांपत्याने त्यासाठी निधी उपलब्ध करून नव्याने पुनर्बांधणी केली.
 
हे काम पूर्ण करून नुकताच ग्रामस्थांना औपचारिक 'लोकार्पण' करण्यात आले. केवळ गाळे गावच नव्हे तर आजूबाजूच्या गावांनाही सुविधा देणार्‍या या प्रकल्पाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
 
तसेच यावेळी २०२०-२१ सालामध्ये रोटेरियन अतुल अग्रवाल यांच्या सहकार्याने गावातील १८ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजना देण्यात आली होती तिचे देखिल औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
 
यावेळी रोटरी क्लब ऑफ मुंबई वर्सोवाचे अध्यक्ष मनीष खेमका, सचिव सुशील डागा, सदस्य अशोक गुप्ता, प्रीती गुप्ता, राजेश अग्रवाल, अंजू अग्रवाल, राजेश चौधरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
 
 
Hindu Cemetery
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121