५०० बालयकृत प्रत्यारोपणाचा टप्पा अपोलोने केला पूर्ण

प्रत्यारोपणाच्या वेळी ५०० वी बालरुग्ण प्रिशाचे वजन अवघे ४.६ किलोग्राम होते

    14-Mar-2023
Total Views | 84
 
Apollo Hospitals
 
 
नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स समूह भारतात रुग्ण सेवेत आघाडीवर असून आरोग्य सेवेमध्ये अवयव प्रत्यारोपण क्रांतीचे ते नेतृत्व करीत आहेत. आज अपोलो हॉस्पिटल्स समूहाने ५०० वे लहान मुलांचे यकृत प्रत्यारोपण यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा केली. अपोलो यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम (अपोलो ट्रान्सप्लांट प्रोग्राम) हा जगभरातील रुग्णांसाठी गुणवत्तेचा आणि आशेचा एक किरण आहे.
 
अपोलो प्रत्यारोपण कार्यक्रम हा उच्च दर्जाची उपकरणे आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह सुप्रसिद्ध आहे, जो जागतिक स्तरावर प्रख्यात असे प्रत्यारोपण शल्यचिकित्सक, नेफ्रोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, पिडिअॅट्रिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, बालशल्यचिकित्सक, एनेस्थेटिस्ट्स, इन्टेन्सिविस्ट, चिकित्सक आणि डॉक्टर्स यांच्या एकत्र गटाद्वारे शक्य तितक्या उच्च गुणवत्तेसह प्रदान केले जाते. गेल्या दशकभरात, या कार्यक्रमाने सर्वोत्कृष्ट दर्जाची काळजी, सेवा आणि संपूर्ण जगात अतुलनीय अशा परिणामांसह विश्वास आणि आणि लौकिक निर्माण केला आहे.
 
डॉ. अनुपम सिब्बल, वैद्यकीय संचालक-ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ व गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले, “आम्हाला हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याचा अभिमान वाटतो आणि आम्ही इतक्या गरजू मुलांना आणि कुटुंबांना मदत करू शकलो याचा आम्हाला अभिमान वाटतो. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक आव्हानांवर मात केली गेली आहे; जसे: चार किलोपेक्षा कमी वजनाच्या लहान बाळांमध्ये प्रत्यारोपण, यकृत निकामी होण्यासारख्या रोगाव्यतिरिक्त गंभीर वैद्यकीय परिस्थिती असलेल्या लहान मुलांमध्ये प्रत्यारोपण, कुटुंबात सुसंगत रक्त गटाचा दाता नसताना एबीओ असंगत (ABO incompatible) प्रत्यारोपण.
 
आम्हाला आनंद आहे की, आमचे हे ५०० वे बालरुग्ण मुलगी आहे आणि आमच्या एकूण बालरुग्णांमध्ये जवळपास ४५% रुग्ण मुली आहेत. १९९८ मध्ये आम्ही भारतात पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण केले. तेव्हापासून, अपोलो प्रत्यारोपण कार्यक्रमने मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये ४१०० हून अधिक यकृत प्रत्यारोपण केले आहे.”
 
अपोलोची ५०० वी यकृत प्रत्यारोपण बालरुग्ण प्रिशाची कहाणी: बिहारच्या मध्यभागी जहानाबाद या छोट्याश्या गावात एका तरुण मध्यमवर्गीय जोडप्याने अत्यंत आनंदाने आणि आवडीने आपल्या पहिल्या मुलीचे नाव ‘प्रिशा’ ठेवले. प्रिशा म्हणजे देवाची देणगी. शिक्षक पती आणि पत्नी गृहिणी जे पालक म्हणून आपल्या पुढच्या प्रवासाची वाट पाहत होते. सुरुवातीचे काही आठवडे आनंदात गेले पण नंतर त्यांना लक्षात आले की प्रिशाला कावीळ झाली आहे. त्यांची एका डॉक्टरांकडून दुसऱ्या डॉक्टरकडे अशी कठीण वाटचाल पूर्ण निराशेची आणि अत्यंत दु:खद झाली कारण त्यांना सांगण्यात आले की, तिला बिलिअरी अॅट्रेशिया नावाचा केवळ मृत्यू हा परिणाम असलेला महाभयंकर आजार आहे, ज्यामध्ये तिचे यकृत निकामी होईल.
 
ते मात्र हार मानायला तयार नव्हते. त्यांनी त्यांच्या आवाक्याबाहेरील पाऊल टाकले आणि यकृत प्रत्यारोपण हे जीवनदायी ठरू शकते हे लक्षात येईपर्यंत अत्यंत तज्ज्ञ चिकित्सकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चालू ठेवला आणि त्यांनी तिला वयाच्या ६ व्या महिन्यात अपोलोमध्ये आणले. आव्हाने खरोखरच अनेक होती पण त्यांच्या निश्चयाने आणि आमच्या टीमच्या वचनबद्धतेमुळे त्या आव्हानांवर आम्ही मात केली. प्रत्यारोपणाची तयारी सुरु असताना तिला पूरक आहार देण्यासाठी आणि पौष्टिक पुनर्वसन साध्य करण्यासाठी तिच्या नाकातून फीडिंग ट्यूब टाकण्यात आली होती. तिच्या आईने आपल्या यकृताचा एक भाग दान केला आणि प्रिशा यशस्वी यकृत प्रत्यारोपणानंतर बरी झाली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121