वर्षभरात एक लाख स्थानांपर्यंत संघ पोहोचणार : डॉ. मनमोहन वैद्य

    13-Mar-2023
Total Views | 114

RSS (1)

RSS Akhil Bharatiya Pratinidhi Sabha Press Meet 


नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) :राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा. स्व. संघ) २०२५ मध्ये शताब्दी पूर्ण करणार आहे. सध्या देशभरात ७१ हजार ३५५ स्थानांवर संघ समाजपरिवर्तनासाठी कार्यरत आहे. आगामी वर्षभरात अशा १ लाख स्थानांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह डॉ. वैद्य यांनी केले आहे.
 
रा. स्व. संघांच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेस हरियाणातील पानिपतमधील समालखा येथे प्रारंभ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य आणि अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी डॉ. वैद्य म्हणाले, २०२५ मध्ये संघ आपल्या स्थापनेची १०० वर्षे पूर्ण करणार आहे. सध्या ७१३५५ ठिकाणी प्रत्यक्ष काम करून संघ सामाजिक परिवर्तनाच्या महत्त्वपूर्ण कार्यात आपली भूमिका बजावत आहे. पुढील वर्षभरात एक लाख ठिकाणी पोहोचण्याचे संघाचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.
 
कोरोनाच्या आपत्तीनंतरही संघाचे कार्य वाढले असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, २०२० मध्ये ३८९१३ ठिकाणी ६२४९१ शाखा, २०३०३ ठिकाणी साप्ताहिक सभा आणि ८७३२ ठिकाणी मासिक सभा झाल्या. २०२३ मध्ये ही संख्या ४२६१३ ठिकाणी ६८६५१ शाखा, २६८७७ ठिकाणी साप्ताहिक सभा आणि १०४१२ ठिकाणी मासिक सभा झाली आहे. संघाच्या दृष्टिकोनातून देशभरात ९११ जिल्हे आहेत, त्यापैकी ९०१ जिल्ह्यांमध्ये संघाचे थेट कार्य चालते.
 
६६६३ पैकी ८८ टक्के मंडलांमध्ये, ५९३२६ मंडळांपैकी २६४९८ मंडळांमध्ये संघाच्या थेट शाखा आहेत. शताब्दी वर्षात संघाचे कार्य वाढवण्यासाठी संघाचे नियमित प्रचारक आणि विस्तारक यांच्या व्यतिरिक्त १३०० कार्यकर्ते दोन वर्षांसाठी शताब्दी विस्तारक बनले आहेत, असेही सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी नमूद केले आहे.
 
संघाप्रती जनतेच्या आस्थेत वाढ
 
जनतेची संघाप्रती असलेली आस्था वाढत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे संघासोबत जोडून घेण्यास लोक उत्सुक आहेत. २०१७ ते २०२२ या काळात ‘जॉईन आरएसएस’द्वारे ७,२५,००० विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. यातील बहुतांश २० ते ३५ वयोगटातील तरुण आहेत, ज्यांना समाजसेवेसाठी संघात सामील व्हायचे आहे. संघाच्या ६० टक्के शाखा या विद्यार्थ्यांच्या शाखा आहेत. गेल्या वर्षभरात १२११३७ तरुणांनी संघाचे प्राथमिक शिक्षण घेतले आहे. आगामी वर्षाच्या योजनेत देशभरात संघ शिक्षणाचे १०९ अध्यापन वर्ग आयोजित केले जातील, ज्यामध्ये सुमारे २० हजार स्वयंसेवकांनी शिक्षण घेणे अपेक्षित आहे.
 
 

अग्रलेख
जरुर वाचा
बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे झालेल्या मृत्यूंसाठी विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार नाही : सर्वोच्च न्यायालय

बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे झालेल्या मृत्यूंसाठी विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार नाही : सर्वोच्च न्यायालय

बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबिय मोटार वाहन कायदा, १९८८ (एमव्ही कायदा) अंतर्गत भरपाईसाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने, बुधवार दि.२ जुलै रोजी दिला आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाने याआधी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी कलम १६६ अंतर्गत केलेली भरपाईची मागणी फेटाळून लावली होती...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121