जितेंद्र जोशीतील कलागुणांना दिग्दर्शकांनी पारखण्याची नितांत गरज - स्मिता तांबे

    16-Dec-2023
Total Views |

jitendra joshi 
 
मुंबई : ‘जोरम’ या हिंदी चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी अभिनेत्री स्मिता तांबे हिने महाएमटीबीशी बोलताना ‘हमीदाबाईची कोठी’ या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटकाचा एक खास किस्सा सांगितला. यावेळी ती अभिनेता जितेंद्र जोशी सोबतच्या जुन्या आठवणीत रमत त्याच्यासोबत जास्त काम न करता आल्याची खंत व्यक्त करुन गेली.
 
काय म्हणाली स्मिता?
 
“ ‘हमीदाबाईची कोठी’ नाटक करत असताना मी आणि अभिनेता जितेंद्र जोशी केवळ भांडतच असायचो. त्याचमुळे आम्ही फार मुल्यवान वेळ एकत्रित घालवला नाही याची मला खंत आहे. जितेंद्र जोशी एक असा अभिनेता आहे जो प्रचंड विद्वान आहे. अजूनही त्याच्यातील कलागुणांना दिग्दर्शकांनी पारखण्याची नितांत गरज आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा जितूचा दृष्टीकोन फार वेगळा आहे. पण हमीदाबाईची कोठी या नाटकापासून ते आजतागायत मी आणि जितूने एकत्रित काम केले नाही. पण अपेक्षा आहे ती संधी लवकर यावी”.
 
दरम्यान, स्टार्स आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'जोरम' या चित्रपटाला 'बेस्ट ज्युरी' हा पुरस्कार देत गौरवण्यात आले आहे. तसेच, 'जोरम' हा सिनेमा यंदाच्या मामि फेस्टिव्हलमध्येही दाखवला गेला होता. इतकेच नव्हे तर, रॉटनहम फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणारा गेल्या २० वर्षांतील 'जोरम' हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देवाशिष माखिजा यांनी केले असून झी स्टुडिओने साहाय्यक निर्मिती केली आहे. दरम्यान, जोरम हा चित्रपट ८ डिसेंबरला जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटात मनोज वाजपेयी, स्मिता तांबे-द्विवेदी आणि तनिष्ठा चॅटर्जी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121