जयपुर : राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच जोर धरत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख लढत आहे. अशात आता मत मागायला आलेल्या काँग्रेस नेत्याची गावकऱ्यांनी हकालपट्टी केली आहे. त्यावेळी गावकऱ्यांनी काँग्रेस विरोधी नारे दिले. तसेच त्यांच्यातील एक तरुण काँग्रसे उमेदवाराला म्हणाला की, एक मतसुद्धा इथे तुम्हाला मिळणार नाही. दरम्यान उमेदवारांने पाणी मागितले. त्यावर तो तरुण म्हणाला की, पाणी दिलेच कधी होते, जे आम्ही तुम्हाला पाणी देऊ. त्यामुळे भ्रष्टाचारी नेत्यासाठी पाणी मिळणार नाही, तसेच तुम्ही आणि तुमच्या सरकारने काय कामे केली ते आधी सांगा, असा सवाल ही तरुणाने विचारला. दरम्यान काँग्रेस नेत्याने ही कामे केली नसल्याची कबुली दिली.