कॅनडात पुन्हा एकदा हिंदू मंदिरांवर हल्ले होणार ; खासदार चंद्र आर्य यांचा दावा!
21-Nov-2023
Total Views |
नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक पुन्हा एकदा कॅनडातील एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याचा कट रचत आहेत. त्याविरोधात कॅनडातील प्रशासनाने हल्ल्यांपूर्वीच कठोर कारवाई करावी, असे कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्र आर्य यांनी म्हटले आहे.
हिंदू मंदिरावरील संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार चंद्र आर्य यांनी ‘एक्स’वर त्याविषयी सावधानतेचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, गेल्या आठवड्यात खलिस्तान समर्थकांनी सरे येथील शीख गुरुद्वाराबाहेर एका शीख कुटुंबाला शिवीगाळ केली होती. आता हेच खलिस्तानी गट सरे येथील हिंदू लक्ष्मी नारायण मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचत आहेत. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे सर्व केले जात आहे. मात्र, कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून कारवाई करण्यात यावी, असे आर्य यांनी म्हटले आहे.