विक्रोळी नवीन आरओबीचे काम पूर्णत्वाकडे

    21-Nov-2023
Total Views |
Vikhroli news

मुंबई : मध्य रेल्वेचे एक प्रमुख स्थानक असणाऱ्या विक्रोळी स्थानकातील रोड ओव्हर ब्रिजचे (आरओबी) काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम लवकरच पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. मध्य रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त भागीदारीतून या पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. या कामाची एकूण किंमत २६.६८ कोटी रुपये इतकी आहे. या पुलामुळे स्थानकावरील गर्दी नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे.
- सबस्ट्रक्चर पूर्ण

- अतिरिक्त संरचनेसाठी निविदा जारी

- गर्डर फॅब्रिकेशन पूर्ण आणि आरडीएसओद्वारे तपासणी

- गर्डर साईटवर आणत ३ गर्डरसाठी असेंब्ली


सुरु असणारी कामे

- पूर्वेकडील बाजूला १०० मीटर लांबीसाठी रेल्वे स्पॅन गर्डर्स लाँच

- मेटलीकरणाचे काम प्रगतीपथावर

- ६१५ मीटर लांबीचे काम प्रगतीपथावर

- सुपरस्ट्रक्चरचे काम ६० टक्के पूर्ण.

- कंपोझिट गर्डर्स आणि त्याचे फॅब्रिकेशन प्रगतीपथावर
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.