एक माणुस विरोध करतो म्हणुन ६ कोटी मराठ्यांना वेठीस धरू नका : जरांगे पाटील

जरांगे पाटलांचा रोख कुणावर ?

    21-Nov-2023
Total Views |
Manoj Jarange Patil on Maratha reservation

ठाणे
: मराठा आंदोलनाचा चेहरा असणारे मनोज जरांगे पाटील यांची ठाण्यात भव्य सभा संपन्न झाली.एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणांनी गडकरी रंगायतन दुमदुमले.एक माणूस विरोध करतो म्हणून तुम्ही ६ कोटी मराठ्यांना वेठीस धरू शकत नाही.आपण कुणाचे नाव घेत नाही.लायकीही नाही. अशा शब्दात जरांगे पाटील यांनी भुजबळांना टोला लगावला.मनोज जरांगे पाटील यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जाहीर सभा पार पडली, मनोज जरांगे पाटील यांच ठाण्यात मोठ्या जल्लोषात व जंगी स्वागत करण्यात आले, खारीगाव टोलनाक्या पासून रॅलीला सुरुवात झाली. माजिवाडा सर्कल परिसरात २५ जेसीबीच्या माध्यमातून ११ टन फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर महापालिका मुख्यालयाजवळ देखील ढोलताश्याच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर मासूंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ठाण्यातील गडकरी रंगायतन याठिकाणी भव्य सभा पार पडली यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी समस्त ठाणेकर मराठा बाधंवाना संबोधित केले. यावेळी आमच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही लढतोय. तुम्ही ठरल्याप्रमाणे करायला तयार नाही.

एक माणूस विरोध करतो म्हणून तुम्ही ६ कोटी मराठ्यांना वेठीस धरू शकत नाही.आपण कुणाचे नाव घेत नाही.लायकीही नाही. आधी विचार म्हणून विरोध होता. वैचारिक मतभेद असले पाहिजे. पण ज्यादिवशी ते कायद्याच्या घटनेच्या पदावर असताना जातीय तेढ निर्माण केली. तेव्हापासून त्या व्यक्तिलाही मराठ्यांचा विरोध आहे अशा शब्दात जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही तुम्हाला महत्त्व देत नाही. तुम्ही पातळी सोडून बोलला. तुम्ही मराठा आरक्षण देऊ नका बोलला, त्यामुळे तुमचा विषय मराठ्यांच्या नजरेतून संपला. तुम्ही कितीही विरोध केला. कितीही कार्यक्रम घेतले तोच मराठ्यांचा फायदा होतोय. आमचे सगळे मराठे एकत्र झालेत. एका सभेने मराठा एकत्र झाले. इतका अनुभव असून काय फायदा, मी रानातला माणूस बरा. कुणाच्या हाताला लागत नाही. प्रशासकीय, शासकीय अनुभव, ३०-३२ वर्ष सत्ता भोगली त्या माणसाने अशी विधाने करावीत. म्हातारपणाला पचत नाही. लोकांचे खाल्ल्यावर पचणार कसे? त्यांनी थोडे शांत राहावे नाहीतर कायम बाथरूममध्ये बसावे लागेल. असा इशारा नाव न घेता भुजबळांना दिला. तसेच ८५ टक्के मराठ्यांना आरक्षण आता मिळाले आहे, यापुढे देखील एकजुटीने लढा एकजुटीने सामोरे जा असही जरांगे म्हणालेत तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी २४ डिसेंबरच्या आत निर्णय घ्यावा नाहीतर २५ डिसेंबर नंतर मराठ्याचा रोष तुम्हाला सहन होणार नाही.असाही इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.