गरज भासल्यास कृत्रिम पाऊस पाडणार : मुख्यमंत्री शिंदे

    21-Nov-2023
Total Views | 46
 
Shinde
 
 
मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कामं सुरू आहेत. गरज भासल्यास कृत्रिम पाऊस पाडणार आहे. त्यासाठी दुबई येथील एका कंपनीशी करार करण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे हे पहाटेच वर्षा या निवासस्थानाहून निघाले. त्यांनी स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपायोजनाची स्वतः पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
 
 
एकनाथ शिंदे म्हणाले, "हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यासाठी जागा त्याठिकाणी झाडे लावण्यात येणार आहे. अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना मांडली आहे. एक दिवसाआड मुंबईतील रस्ते पाण्याने धुतले तर प्रदूषणावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले जाईल. कचराही रोज उचलला जात आहे. स्वच्छतेवर आम्ही खूप भर दिला आहे. रस्ते, फुटपाथ आणि नाल्यांची स्वच्छता करा. संपूर्ण बीच स्वच्छता करण्यासाठी एक टीम लावण्यात येणार आहे. सार्वजनिक शौचालय दिवसातून चार ते पाच वेळा स्वच्छ केले जाईल."
 
 
 
"एक एक ठिकाण घेऊन ते स्वच्छ करा. मुख्य रस्तेच नाहीत तर आतले छोटे रस्तेही साफ करण्याची सूचना दिली आहे. मुंबईतची स्वच्छता ही लोकचळवळ व्हायला हवी, त्यासाठी सर्वांनी मदत करायला हवी. सकाळी पाच वाजेपासून मी पाहणी करत आहे. मनपाचे अधिकारी या पाहणीत उपस्थित होते. सर्व जण जोराने कामाला लागले आहे. यामुळे मुंबई स्वच्छ होऊन हवेतील प्रदूषण कमी होणार आहे. चागंली हवा मुंबईकरांना मिळणार आहे." असं शिंदे म्हणाले आहेत.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121