रांचीमध्ये एकाच वेळी ४ मंदिरांची तोडफोड! संतप्त नागरिकांची रस्त्यावर उतरून निदर्शने
21-Nov-2023
Total Views |
रांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये एकाच वेळी अनेक हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याची बातमी पुढे आली आहे. काही अज्ञातांनी देवी-देवतांच्या मुर्त्या कटरने कापल्या आहेत. शुक्रवार १७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असून हिंदू संघटनांनी या घटनेचा निषेध करत निदर्शने केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रांचीच्या मांडर भागात ही घटना घडली आहे. येथील लोकांना सकाळी उठल्यानंतर मंदिरातील मुर्त्यांची तोडफोड झाल्याची माहिती मिळाली. यामध्ये परिसरातील महावीर मंदिर, छोटा बजरंग बली मंदिर, बूढा महादेव आणि मडई देवी मंडप इत्यादी मंदिरांचा समावेश आहे. एवढेच नाही तर आरोपींनी मंदिरातील देवी-देवतांच्या मुर्त्यांना कटरने कापल्याचेही लोकांना कळले.
घटनेनंतर थोड्या वेळातच तुटलेल्या मुर्त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. चक्काजाम करुन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परंतू, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.