नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

सुहासिनी देशपांडे आणि अशोक समेळ ठरले मानकरी

    17-Nov-2023
Total Views |

puraskar 
 
मुंबई : महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाने नुकतेच कला साहित्य क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. एकूण २८ कलाकारांना जाहीर केले आहेत. हे पुरस्कार २०२२ आणि २०२३ सालचे आहेत. राज्याच्या सांस्कृतिक विभागाने गुरुवारी यासंदर्भात घोषणा केली. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, ज्योती सुभाष यांच्यासह १२ कलाकारांना यावर्षीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
 
नाटक विभाग, उपशास्त्रीय संगीत, कंठसंगीत, लोककला, शाहिरी, नृत्य, चित्रपट, किर्तन/समाजप्रबोधन, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि संगीताचार्य कै. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत.
 
नाटक विभागात सन २०२२ साठी वंदना गुप्ते, तर २०२३ साठी ज्योती सुभाष यांची निवड करण्यात आली आहे. तर, उपशास्त्रीय संगीत - मोरेश्वर निस्ताने (२०२२), पं. ऋषिकेश बोडस (२०२३), कंठसंगीत - अपर्णा मयेकर (२०२२), रघुनंदन पणशीकर (२०२३), लोककला - हिरालाल सहारे (२०२२), किर्तनकार भाऊराव थुटे (२०२३), शाहिरी - शाहीर जयवंत रणदिवे (२०२२), शाहीर राजू राऊत (२०२३), नृत्य - लता सुरेंद्र (२०२२), सदानंद राणे (२०२३), चित्रपट - चेतन दळवी (२०२२), निशिगंधा वाड (२०२३), किर्तन/समाजप्रबोधन - प्राची गडकरी (२०२२), ह.भ.प. अमृत महाराज जोशी (२०२३), वाद्यसंगीत पं. अनंत केमकर (२०२२), शशिकांत सुरेश भोसले (२०२३), कलादान - प्रा.डॉ. संगिता टेकाडे (२०२२), यशवंत तेंडोलकर (२०२३), तमाशा - बुढ्ढणभाई बेपारी वेल्हेकर (२०२२), उमा खुडे (२०२३), आदिवासी गिरीजन विभागात भिकल्या धाकल्या धिंडा (२०२२), सुरेश नाना रणसिंग (२०२३) यांची राज्य सांस्कृतिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
 
त्याचप्रमाणे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सुहासिनी देशपांडे (२०२२) आणि अशोक समेळ (२०२३) यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार पं. उल्हास कशाळकर (२०२२) आणि पं. शशिकांत मुळ्ये (२०२३) यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांची गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारासाठी एकमताने निवड करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त नयना आपटे (२०२२) आणि मकरंद कुंडले (२०२३) यांना संगीताचार्य कै. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.