"'ती' शिवसेना शाखा पाडण्यासाठी आव्हाडांचाच प्रयत्न हा घ्या पुरावा!"

शिवसेना नेते नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

    17-Nov-2023
Total Views |
 
Awad
 
 
मुंबई : मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा पाडण्यासाठी राष्ट्वादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीच प्रयत्न केलेत. असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांनी ट्विटद्वारे व्हिडीओ शेअर केला आहे. पुराव्यासकट आव्हाडांची नरेश म्हस्केंनी पोलखोल केली आहे. ट्विट केलेल्या व्हिडीओत आव्हाड मुंब्र्यातील शाखेबद्दल बोलताना दिसत आहेत. तर, दुसऱ्या व्हिडीओत उद्धव ठाकरे यांनी शाखेला भेट दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेचा भाग ट्विट केला आहे.
 
 
नरेश म्हस्के म्हणाले, "हा घ्या #पुरावा...! हीच होती ना पत्रकार परिषद ज्यात जित्या बकला होता 'पुरावा द्या' चा फुत्कार लोकांसमोर टाकला होता उद्धव साहेबांचा तर स्वभावच त्यांच्या एका प्रश्नातून दिसला 35 वर्षांचा 'कार्य'काळ त्यांनी एका शब्दात पुसून टाकला असो, फार राग नाही. दुःख मात्र सतत आहे बाळासाहेबांच्या नंतर सारंच आक्रीत घडत आहे जित्या तुला संस्कृती नाही आतापर्यंत माहीत होतं संस्कारांचीही होळी केलीस पदोपदी दिसून येतं तुझं काय काय 'अनधिकृत' आहेआम्हांला सारं ठाऊक आहे नादी लावून देशोधडीला लावण्याचा राष्ट्राबादी धंदा घाऊक आहे घे जित्या तुला पाहिजे होता ना रे पुरावा आमच्या शाखांचा नाद सोड तो आव हाडाने नाही, शिवसैनिकांनीच करावा." असा हल्लाबोल नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.