नवी दिल्ली : इस्रायलचे अध्यक्ष इसहाक हर्जोग यांनी दि.१६ नोव्हेंबर रोजी इराणवर भारत मध्य पूर्व आर्थिक कॉरिडॉर रुळावरून घसरल्याचा आरोप केला. दरम्यान हमासवर ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याची योजना आखल्याचा ही आरोप त्यांनी केला. हर्झोगने पुढे असा दावा केला की इराण प्रादेशिक परिस्थिती खराब करण्याच्या उद्देशाने अब्जावधी डॉलर्स देऊन दहशतवादी कारवायांना पाठिंबा देत आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अध्यक्ष आयझॅक हर्झोग म्हणाले, “आमच्यावर उत्तरेकडून हिजबुल्लाह, ही एक मोठी दहशतवादी संघटना आहे. ज्याने लेबनॉन इराणच्या हातात दिला आहे. तिथे संपूर्ण प्रदेशात इस्लामिक कट्टरतावाद पसरवतो."
इसहाक हर्जोग म्हणाले की, सीरिया, लेबनॉन आणि गाझा ताब्यात घेतला आहे. आता येमेनमधून इस्रायल आणि इराकवर हल्ले होत आहेत. "प्रादेशिक परिस्थिती बिघडवण्याचे इराणचे प्रयत्न किती वाईट आहेत हे प्रत्येकाला माहित असले पाहिजे." तसेच भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (IMEC) जी २० शिखर परिषदेदरम्यान भारताला अधिक बळ देण्यासाठी एक दूरदर्शी पाऊल आहे. यामुळे प्रदेशाच्या विकासात इस्रायलच्या सहभागाचा मार्ग मोकळा होतो.भारत, अमेरिका, UAE, सौदी अरेबिया, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि युरोपियन युनियनने भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरची स्थापना करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.
तसेच इसहाक हर्जोग म्हणाले की, “सुमारे दोन महिन्यांपूर्वी G-20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलपासून भारत, आखाती आणि जॉर्डनमधील सौदी अरेबियापर्यंत ऊर्जा, दळणवळण, व्यापार आणि विज्ञानाच्या विशेष कॉरिडॉरची घोषणा केली होती. ते आपल्या सर्वांना एकत्र जोडेल. ते युरोप ते आग्नेय आशिया आणि अगदी अमेरिका ते ऑस्ट्रेलियाला जोडेल. ही एक भव्य दृष्टी आहे जी भारताला मोठी ताकद देईल.” इस्त्राईलला ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात इराणचा हात असल्याचा पुरावा आहे का, असे विचारले असता? हर्झोग म्हणाले की त्यांच्याकडे विशिष्ट पुरावे नसले तरी हल्ल्याच्या काही आठवड्यांपूर्वी दहशतवादी नेते बेरूतमध्ये भेटले होते, असे त्यांनी सुचवले.
भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC) हा अनेक देशांमधील व्यापारी मार्ग आहे. मध्यपूर्वेतील देशांना रेल्वे आणि बंदरांच्या माध्यमातून भारताशी जोडणे हा त्याचा उद्देश आहे. या कॉरिडॉरद्वारे भारताला युरोपशी जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. या कॉरिडॉरमध्ये संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, सौदी अरेबिया आणि इस्रायलचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा कॉरिडॉर अंदाजे ६ हजार किमी लांबीचा असेल. यामध्ये सुमारे साडेतीन हजार किलोमीटरचा सागरी मार्ग असणार आहे.या ऐतिहासिक कॉरिडॉरच्या उभारणीमुळे भारताला आपला माल युरोपला नेण्यासाठी सुमारे ४० टक्के कमी वेळ लागेल. यामध्ये रेल्वे, सागरी आणि रस्ते वाहतूक मार्गांचा समावेश असेल. तज्ज्ञांच्या मते, भारताने इराणमधील चाबहार बंदरात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, परंतु अनेकवेळा असे अहवालही समोर आले आहेत, ज्यामध्ये चीन त्याचा गैरफायदा घेताना दिसत आहे.