महाराष्ट्र : पुढील वर्षी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी राज्यातील एका दाम्पत्याकडून प्रभू श्रीरामाची वस्त्रे विणण्याचे कार्य सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांसदर्भात X वर पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून रामललाच्या मंदिर उद्धाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध ठिकाणी तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मंदिराचे भव्य उद्घाटन करण्यात येणार असून दो धागे प्रभू श्रीराम के लिये, असे म्हणत बावनकुळेंनी आपल्या पोस्टमध्ये वस्त्रे विणण्याच्या कार्यास अनोखी करसेवा असे संबोधले आहे. तसेच, ही अनोखी कारसेवा पुण्याच्या 'हेरिटेज हँड विवींग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट' च्या अनघा घैसास या करत आहेत.
दरम्यान, पुण्यात डिसेंबर महिन्यात विविध राज्यातील हातमागांवर त्या त्या राज्यांच्या विशेषत: प्रमाणे तेथील विणकर बंधू कापड विणतील आणि अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टला सुपूर्त करतील. यातून श्रीरामाची विविध वस्त्रे शिवली जातील. अशी ही अनोखी कर सेवा असून पुण्याच्या 'हेरिटेज हँड विवींग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट' च्या अनघा घैसास यांनी पुढाकार घेतला.
तसेच, संस्कृतमध्ये उभ्या आडव्या धाग्यांना ओत व प्रोत असे म्हणतात. याच भावनेतून सर्व रामभक्तांची 'ओत-प्रोत' घट्ट वीण विणली जाते आहे. धागा विणणार्या प्रत्येक व्यक्तीचा श्रीरामाशी संबंध आला असणार या प्रसन्न भावानेने दो धागे श्रीराम के लिए ही सेवा सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनघा घैसास आणि संपूर्ण रामभक्तांचे मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छादेखील दिल्या आहेत.