दिल्लीतील तुरुंगात होते कैद्यांकडून होते वसुली! केजरीवाल मास्टरमाईंड!
ठग सुकेश चंद्रशेखरने फोडला लेटर बॉम्ब
16-Nov-2023
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मंडोली तुरुंगात कैद्यांकडून वसूली करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या तुरुंगात बंदिस्त असलेला ठग सुकेश चंद्रशेखर याने हा आरोप केला आहे. एका व्हिडीओद्वारे त्यांने हा आरोप केला आहे.
कारागृह प्रशासनातील लोक कैद्यांकडून पैसे वसूल करतात आणि पैसे न दिल्यास कैद्यांचा छळ केला जात असल्याचे सुकेश चंद्रशेखरने म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्यावरून दिल्लीतील तुरुंगात खंडणीचा खेळ होतो. तसेच कैद्यांकडून वसुल करण्यात आलेल्या पैशांचा उपयोग केजरीवाल आपल्या राजकीय कामांसाठी करत असल्याचेही सुकेश चंद्रशेखर याने म्हटले आहे. तसेच तो स्वतः या सगळ्याला बळी पडला असल्याचेही त्यांने सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठग सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातूनच लेटर बॉम्ब फोडला आहे. यात त्याने म्हटले की, "केजरीवालजी कृपया सीबीआयच्या तपासात सहकार्य करा आणि माझ्या आरोपांची वन टू वन नार्को टेस्ट करा. सर्वात मोठा ठग कोण आहे याचा निर्णय न्यायालय घेईल, असे सुकेशने पत्रात लिहिले आहे.
त्याने पुढे लिहिले की, "अरविंद केजरीवाल आधी तुम्ही स्वतःकडे बघा. तुमचे तीन सहकारी जनतेचा पैसा लुटणे आणि भ्रष्टाचारासारख्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. मुख्य सुत्रधार तुम्हीच असून तुम्हीसुद्धा लवकरच तिहार क्लबचा भाग होणार आहात," असेही त्याने म्हटले आहे.
"चिंता करु नका. तुमचे नाव आणि तुमच्या सहकाऱ्यांचा खेळ उघड करणारे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, असेही त्याने म्हटले आहे. यासोबतच अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी आपल्याला गप्प करण्यासाठी धमक्या आणि ऑफर देत आहे. यासाठी केजरीवाल यांनी राज्यसभेतील सीटचीही ऑफर दिल्याचे सुकेश चंद्रशेखरने म्हटले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.