राज ठाकरेंना जरांगेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले, "माझ्यापाठी..."
16-Nov-2023
Total Views |
बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे हे लवकरच बाहेर येईल, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. याबद्दल आता मनोज जरांगे पाटील यांनीही चोख प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. जरांगे पाटील सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. संपूर्ण राज्यात ते मराठा बांधवांची भेट घेऊन १ डिसेंबरपासून साखळी उपोषणासाठी आवाहन करणार आहेत. याच दरम्यान राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली आहे. जरांगेंच्या मागे नेमकं कोण आहे याबद्दल लवकरच कळेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
जरांगेंनीही याबद्दल राज ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत. "माझ्या पाठिशी संपूर्ण मराठा समाज आहे. राज ठाकरेंनी माझ्या पाठिशी कोण आहे याचा शोध नक्की घ्यावा. संपूर्ण महाराष्ट्राला ही गोष्ट कळू दे आम्हालाही कळू द्या. फक्त त्यांना आवाहन आहे की त्यांनी शोधून काढावं. आम्हाला सुद्धा हा शोध लागला नाही. मराठा समाजच आमच्या पाठिशी आहे. मराठा समाज एकवटू लागला की राज ठाकरेंसारख्यांच्या पोटात दुखू लागतं. पण आता असं होणार नाही. मराठा समाजालाही आता आपलं हित कळलं आहे," अशी प्रतिक्रीया जरांगेंनी यावेळी दिली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.