मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत आणखी एका बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. सहारा इंडियाचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष सुब्रत रॉय यांचे मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी सुब्रत रॉय यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या दिवशीच या बायोपिकची घोषणा केली होती.
सुब्रत रॉय यांची ‘सहाराश्री’ या नावाने विशेष ओळख होती. त्यांनी १९७८ मध्ये सहारा इंडियाची स्थापना केली होती. त्यांचा हा संपुर्ण प्रवास मोठ्या पडद्यावर आता दाखवला जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग आणि जयंतीलाल गडा करणार आहेत.