धाराशिव : मराठा संघटना कार्यकर्त्यांतर्फे रेलरोको!
31-Oct-2023
Total Views | 68
धाराशिव : मराठा आरक्षणासाठी आता राज्यभरात आंदोलन करण्यात येत असून मंगळवारी धाराशिवमध्येही मराठा संघटनेकडून आंदोलन करण्यात आले आहे. धाराशिवमध्ये मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून रेल रोको आंदोलन करण्यात आले आहे.
मराठा संघटनेतील लोकांनी धाराशिव रेल्वे स्थानकावर एकत्र येत रेल रोको आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलक सरळ रेल्वे रुळावर जाऊन बसले आहेत. याठिकाणी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ अनेक घोषणाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ३० ऑक्टोबर रोजी मराठा आंदोलनाला हिंसक स्वरुप प्राप्त झाले होते. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी आंदोलकांकडून जाळपोळ करण्यात आली. तसेच बसवर दगडफेकही करण्यात आली होती. त्यामुळे धाराशिवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक रुप प्राप्त झाल्याने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतू, मंगळवारी आंदोलकांनी रेल्वे रोको आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.