कल्याण-डोंबिवली महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2022
Total Views |
 
 
 
aayog
 
 
 
 
टिटवाळा : मुदत संपलेल्या राज्यातील महानगरपालिकांना निवडणूक आयोगाने पत्र पाठवून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार शुक्रवारी कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. पालिका निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १५,१८,७६२ असून लोकसंख्येच्या निकषानुसार निवडून द्यावयाच्या महापालिका सदस्यांची संख्या १३३ इतकी आहे. सदरची निवडणूक ही बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे.
 
 
 
एकूण प्रभागांची संख्या ५५ असून, तीन सदस्यांचे ४३ प्रभाग व चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या१,५०,१७१ व अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४२,५८४ इतकी आहे. अनुसूचित जातीसाठी एकूण १३ जागा राखीव राहणार असून, त्यापैकी सात जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी चार जागा राखीव राहणार असून,त्यापैकी दोन जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.
  
तसेच, सर्वसाधारण महिलांसाठी ५८ जागा राखीव राहणार असून उर्वरित ५८जागा या सर्वसाधारण असणार आहेत. एकूण ९९७ हरकतींपैकी ३७५ मान्य करण्यात आल्या आहेत. त्यात ३६४ हरकती फक्त प्रभागाच्या नावासाठी घेण्यात आल्या होत्या.
त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाचे पुढील आदेश आल्यावर त्याप्रमाणेपुढील तरतूद करण्यात येईल, अशी माहिती कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त सुधाकर जगताप यांनी दिली आहे.
 
 
दरम्यान, कल्याण पूर्व, पश्चिमेतील सात प्रभागांच्या सीमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काळा तलाव, ठाणकरपाडा, सिद्धेश्वर आळी, जोशीबाग, रामबाग सिंडिकेट, लोकग्राम, नेतिवली मेट्रोमॉल या प्रभागांच्या सीमांमध्ये बदल करण्यात आला आहे. नागरिकांना प्रभाग रचना पाहण्याची सोय ही सर्व प्रभाग कार्यालयांच्या सूचना फलकांवर, महानगरपालिका मुख्यालय व ज्ञवालशश्रशलींळेप.लेा या संकेतस्थळावर शुक्रवारपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
‘सर्वपक्षीय नगरसेवक आणि उमेदवारांची सर्वोच्च न्यायालया व फसवणूक’
राज्य निवडणूक आयोगाने मध्यंतरी परिपत्रक काढले होते. त्या परिपत्रकानुसार पुन्हा प्रभाग रचना नव्याने प्रसिद्ध करून त्यावर पुन्हा हरकती सूचना मागवून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने येत्या १५ दिवसात निवडणुकीसंदर्भात निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारला सूचित केले. या आदेशाचा फायदा घेत महापालिकेने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करून सर्वपक्षीय नगरसेवक आणि उमेदवारांची दिशाभूल आणि फसवणूक केली आहे, असा आरोप भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी केला आहे.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@