मोठी बातमी! विधानभवन परिसरात आग; 'हे' कारण आलं समोर

    19-May-2025
Total Views | 15
 
Vidhan Bhavan Fire
 
मुंबई : मुंबईच्या विधानभवन परिसरात आग लागल्याची घटना घडली असून संपूर्ण परिसरात आगीचे धूर निघत आहेत. दरम्यान, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
 
सोमवार, १९ मे रोजी विधानभवन येथे सन २०२४-२५ वर्षासाठी महाराष्ट्र विधांमंडळाच्या सर्व समित्यांचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे सर्व आमदार यावेळी विधानभवन परिसरात आहेत. याचवेळी विधानभवनाच्या प्रवेशद्वारात आग लागल्याची घटना घडली आहे.
 
हे वाचलंत का? -  सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा, दिरंगाई नको! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
 
नेमकं कारण काय? 
 
विधानभवन प्रवेशद्वाराच्या परिसरात असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात असलेल्या स्कॅनिंग मशिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही आग लागली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतेही नुकसान झाले नसून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121