महाराष्ट्राच्या काही भागात आजपासून होणार लोडशेडिंग; मुंबईचा समावेश नाही

    12-Apr-2022
Total Views | 72

BN 
 
मुंबई (प्रतिनिधी):  विजेच्या मागणीत झालेली वाढ आणि पुरवठ्याच्या संकटामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला २५०० मेगावॅट ते ३००० मेगावॅटच्या तफावत भासत आहे. राज्य सरकारच्या मालकीच्या वीज वितरण कंपनीच्या म्हणण्यानुसार ते महाराष्ट्रातील बहुतेक भागांना वीजपुरवठा करतात, त्यामुळे राज्यभरातील अनेक भागात लोडशेडिंग सुरू होईल.
 
 
 
फेब्रुवारीपासून उष्णतेत झालेली वाढ आणि कृषी आणि औद्योगिक ग्राहकांच्या मागणीत झालेली वाढ यामुळे २८,००० मेगावॅटपेक्षा जास्त मागणी वाढली आहे. महावितरण सुमारे २४,५०० मेगावॅटची मागणी पूर्ण करत आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे ४००० मेगावॅटने जास्त आहे. ही मागणी सुमारे २५,५०० मेगावॅटपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की त्यांना सुमारे २५०० मेगावॅट ते ३००० मेगावॅट चा तुटवडा जाणवत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र विद्युत नियमक आयोगाने घालून दिलेल्या 'प्रोटोकॉल'नुसार शहरी आणि ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरू करणे बंधनकारक झाले आहे. देशव्यापी कोळसा पुरवठा संकटामुळे महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजेनको) द्वारे संचालित औष्णिक वीज केंद्रावरील कोळसा साठ्यावर आणि निर्मिती क्षमतेवर परिणाम झाला आहे. कोळशाच्या संकटामुळे महावितरणला औष्णिक स्त्रोतांकडून ६००० मेगावॅटचा पुरवठा टंचाईचा सामना करावा लागत आहे. काही कोळसा-आधारित औष्णिक प्रकल्प देखील नियोजित आणि सक्तीच्या आउटेजेसचा सामना करत आहेत.
 
 
महाजेनकोने सर्वाधिक मागणी पूर्ण करण्यासाठी १९६० मेगावॅटचा कोयना जलविद्युत प्रकल्प वापरात असला तरी, पाण्याच्या उपलब्धतेमुळे त्याचा वापर मर्यादित आहे. 'नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन' १५ जूनपर्यंत दररोज ६७३ मेगावॅट पुरवठा करेल आणि 'कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेड' (सीजीपीएल मुंद्रा) प्रकल्पातून 760 मेगावॅटची खरेदी केली जात आहे, त्यापैकी ४१५  मेगावॅट सोमवारी मध्यरात्रीपासून उपलब्ध झाले आहेत. मात्र असे असतानाही ही कमतरता कायम आहे. विजेच्या मागणीतील देशव्यापी वाढीमुळे ऊर्जा एक्सचेंजमध्ये विजेचे दर वाढले आहेत. कोळसा पुरवठ्याच्या समस्यांमुळे या विजेच्या उपलब्धतेवरही परिणाम होत आहे. महाजेनको ची क्षमता १३,९०२ मेगावॅट इतकी आहे, ज्यामध्ये ९७५० मेगावॅट कोळसा-आधारित औष्णिक उर्जा, २५८० मेगावॅट जलविद्युत, तसेच ६७२ मेगावॅट गॅस आणि २०७ मेगावॅट सौरऊर्जेमध्ये आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121