गुंतवणूकदार मालामाल! : शेअर बाजाराचा विक्रमी उच्चांक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2021
Total Views |

SENSEX _1  H x



मुंबई : आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराने उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५७ हजार ६२५ तर निफ्टी १७ हजार १५३ अंकांवर उसळी घेऊन आला. दिवसअखेर सेन्सेक्स ६६२ अंकांनी वाढून ५७ हजार ५५२ वर तर निफ्टी २०१ अंकांनी वधारत १७ हजार १३२ वर बंद झाला. यापूर्वी सेंसेक्स ५६ हजार ९९५.१५ वर तर निफ्टी १६ हजार ९४७ वर खुला झाला होता.


मंगळवारी सेन्सेक्सचे ३० पैकी २६ शेअर्समध्ये खरेदी झाली, तर चार शेअरमध्ये घसरण दिसून आली. भारती एयरटेलचा शेयर ६.९९ टक्क्यांच्या वधारणीसह ६६२ वर बंद झाला. बजाज फायनान्सचा शेअर ४.९९ टक्क्यांनी तेजीसह बंद झाला. नेस्ले इंडियाच्या शेअरमध्ये १.२९ टक्क्यांची घसरण झाली.


बीएसईचे बाजार भांडवल अडीचशे लाख कोटींवर
बीएसईवर ३,३४१ शेअर्समध्ये दिवसभर उलाढाल झाली. त्यापैकी १,५६९ शेअर्स वधारत बंद झाले. १,६२६ शेअर्समध्ये घसरण नोंदविण्यात आली. बीएसईवर नोंदणीकृत भांडवल पहिल्यांदा २४९.९८ लाख कोटींवर पोहोचले. त्यापूर्वी सोमवारी सेंसेक्स ७६५ अंकांनी वधारत ५६ हजार ८९० वर आणि निफ्टी २२६ अंकांनी वधारत १६ हजार ९३१ वर बंद झाला.


बीएसईवर ३१३ शेअर्सवर अप्पर सर्किट
सेन्सेक्सच्या ३१३ शेअर्सवर अप्पर सर्कीट लागले. २०३ शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर होते. बाजारातील २१ शेअर्स वर्षभराच्या निच्चांकावर कामगिरी करत होते. त्याशिवाय ३११ शेअर्समध्ये अप्पर सर्कीट लागले होते. तसेच २२० शेअर्समध्ये लोअर सर्किट लागले होते.


@@AUTHORINFO_V1@@