गेल्या महिन्याभरात राज्यातील ३,५५२ हे. कांदळवन 'राखीव वनक्षेत्र' म्हणून घोषित

    दिनांक  28-Jan-2021 16:00:31
|
mangrove _1  H


रायगड, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिह्यातील जमिनींचा समावेशमुंबई (प्रतिनिधी) - वन विभागाने २० जानेवारी रोजी अधिसूचना काढून रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील १९.७७ चौ.किमी कांदळन क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा अंतिम दर्जा दिला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील वाशी, नेरूळ, घणसोली, एरोलीसह एकूण १४ गावांचा समावेश असून रायगडमधील रोहा आणि पेण तालुक्यातील कांदवळन जमिनीही वन विभागाच्या ताब्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच वन विभाागाने राज्यातील १५.७५ चौ.किमी कांदळवन जमीन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केली होती.
 
 

वन कायदा, १९२७ च्या कलम २० नुसार ठाण्यातील १४५८ हेक्टर आणि रायगडमधील ३६९ हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. यामध्ये पेण तालुक्यातील २४१ हेक्टर आणि रोह्यातील १२८ हेक्टर कांदळव क्षेत्राचा समावेश आहे. जमिनींवरील नागरी हरकती आणि दाव्यांची पूर्तता करुन त्यांना राखीव वनक्षेत्राचा अंतिम दर्जा देण्यात आला आहे. या जमिनी पूर्वीपासून वन विभागाच्या कांदळवन कक्षाच्या ताब्यात होत्या. या जमिनींवर वन कायद्यातील कलम ४ अंतर्गत नागरी दाव्यांच्या पूरर्तेचे काम सुरू होते. जिल्हा प्रशासनाकडून हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने अधिसूचाना काढून या जमिनींना राखीव वनक्षेत्राचा अंतिम दर्जा दिला.

वन विभागाने १२ जानेवारी रोजीही अधिसूचना काढून राज्यातील सिंधदुर्ग, रायगड, ठाणे आणि मुंबईतील अंधेरी-बोरिवली जिल्ह्यातील १,५७५ हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले होते. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३७४.५ हे, रायगड ३९२ हे, बोरिवलीतील १८२.९ हे, अंधेरीतील ७० हे आणि ठाण्यातील ५५४.७ हे क्षेत्राचा समावेश होता. याशिवाय ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यातील ३५०.५१ हे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ताब्यातील १०३६.८८ हेक्टर कांदळवन आच्छादित जमीन कलम ४ अंतर्गत राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले होते.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.