‘हिमोडायलिसिस’ आणि आहारविषयक मार्गदर्शक सूचना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2021
Total Views |
milk  _1  H x W
तुमचे आहारतज्ज्ञ तुमच्या आजाराचा विचार करून खास तुमच्यासाठी आहाराचे नियम तयार करून देतीलच, पण त्याचबरोबर ‘हिमोडायलिसिस’ सुरू करणार्‍या प्रौढ व्यक्तींनी आवर्जून लक्षात ठेवावेत, असे काही ठळक मुद्द्यांचा विचार करुया.
 
 
मोडायलिसिस’मध्ये रुग्णाच्या शरीरातील रक्तनळ्यांवाटे डायलिसिस यंत्रामध्ये वाहून नेले जाते व तिथे ते रक्त शुद्ध करणार्‍या ‘डायलायझर’ नावाच्या फिल्टरमधून प्रवाहित केले जाते. या प्रक्रियेद्वारे रक्तातील अशुद्धी आणि अतिरिक्त द्राव काढून टाकला गेला की, शुद्ध झालेले रक्त यंत्रामधून नळ्यांवाटे पुन्हा शरीरात प्रवाहित केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला साधारणपणे तीन-चार तास लागतात व रुग्णाचे वजन, त्याची मूत्रपिंडे किती चांगल्या प्रकारे काम करत आहे, तसेच शरीरामध्ये अतिरिक्त द्राव किती प्रमाणात साठत आहे, यानुसार आठवड्यातून सुमारे तीन वेळा ती करावी लागते.
 
 
‘हिमोडायलिसिस’ घेणार्‍या व्यक्तीने आपल्या आहारात अनेक बदल करणे अपेक्षित असते. तुमची ‘डायलिसिस’ची औषधे परिणामकारक ठरावीत, तुम्हाला उत्तम वाटावे आणि किडनीचा आजार व ‘डायलिसिस’शी संबंधित अनपेक्षित धोके उद्भवू नयेत, यासाठी तुमचे आहारतज्ज्ञ आणि विशेषज्ज्ञ तुम्हाला ‘हिमोडायलिसिस डाएट’ स्वीकारण्याचा ठाम सल्ला देतील. तुमचे आहारतज्ज्ञ तुमच्या आजाराचा विचार करून खास तुमच्यासाठी आहाराचे नियम तयार करून देतीलच, पण त्याचबरोबर ‘हिमोडायलिसिस’ सुरू करणार्‍या प्रौढ व्यक्तींनी आवर्जून लक्षात ठेवावेत, असे काही ठळक मुद्द्यांचा विचार करुया.
 
 
‘हिमोडायलिसिस’च्या दरम्यान शरीरातील काही प्रथिनं गमावली जातात. आहारतज्ज्ञांनी सुचविलेल्या प्रमाणात त्यांचे पुनर्भरण गरजेचे आहे. आहारात प्रथिनयुक्त पदार्थ (मासे, पोल्ट्री, मांस आणि अंडी वा अंड्याला पर्याय असणारे इतर पदार्थ), पिष्टमय पदार्थ (पाव, सिरील, तांदूळ आणि नूडल्स) फळे, (रसाळ फळांपेक्षा तंतुमय फळे अधिक प्रमाणात खावीत) आणि भाज्या यांचा समावेश अधिक प्रमाणात असावा. आहारातील सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचा समावेश आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार मर्यादेत ठेवा.
 
 
विपुल प्रमाणात फॉस्फरस असलेले पोषक अन्न (दुग्धजन्य पदार्थ, वाळवलेल्या शेंगा, नट्टी स्प्रेड्स, नट्स आणि बिया, तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असलेली अन्नधान्य) आणि फॉस्फरसयुक्त पदार्थ (एअरेटेड पेये, प्रीपेअरिंग ब्लेण्ड्स, नॉन-डेअरी फ्लेवर्स आणि दुसर्‍याने हाताळलेले व मॅरिनेट केलेले मांस) टाळा. आहारातील मिठाचे प्रमाण कमीत-कमी असणे चांगले, त्याला को-सॉल्ट, न्यू-सॉल्ट असे पर्याय आहेत. मिठामध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असणे, काही प्रकरणांमध्ये प्राणघातक ठरू शकते.
 
 
आहारावरील अशा निर्बंधांमुळे तुमच्या आहारात पोषक घटक आणि खनिजे यांचा समावेश पुरेशा प्रमाणात होऊ शकत नाही व ‘हिमोडायलिसिस’मधून शरीरातील काही खनिजं निघून जातात. तेव्हा आपल्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार जीवनसत्वे आणि खनिजे यांच्या सप्लिमेंट्स घेणे योग्य ठरेल. आहारावरील निर्बंधांमुळे तुम्हाला तुमच्या आहारपद्धतीमधून पुरेसे पोषक घटक आणि खनिजे कदाचित मिळणार नाहीत. अशावेळी आपले स्वास्थ्य जपण्यासाठी प्रो-बायोटिक्सचा वापर करण्यापूर्वी किंवा आहाराला पूरक घटकांची जोड देण्यापूर्वी किंवा आहारतज्ज्ञांनी दिलेल्या आहाराच्या सोबतीने किंवा त्याच्याऐवजी अन्य काही औषधे घेण्यापूर्वी आपल्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
 
 
‘डायलिसिस’ उपचारांच्या दरम्यान तुम्ही आपल्या आहारातील सोडियम (मीठ) आणि द्रवपदार्थांचे प्रमाण किती मर्यादेत ठेवता, ही गोष्टही महत्त्वाची आहे. द्रवपदार्थांचे प्रमाण हे केवळ तुम्ही काय पिता एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर जिलेटिन, बर्फ, सरबत, कलिंगड, सॉसेस आणि फ्लेवर्स आदी खाद्यपदार्थही त्याला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे द्रवांच्या सेवनावर मर्यादा ठेवण्यासाठी तुमचे आहारतज्ज्ञ तुम्हाला काही नियम आखून देतील. त्या नियमांचे पालन करा.
हे सगळे नियम पाळताना, ‘हिमोडायलिसिस’साठीचा आहार तुमचे ‘ऑब्जेक्टिव्ह’ किंवा ‘ड्राय’ वजन राखण्याच्या दृष्टीने नीट काम करतो आहे की नाही, हे सांगता येणे, त्यावर लक्ष ठेवणेही महत्त्वाचे आहे.
 
 
‘ऑब्जेक्टिव्ह’ वजन म्हणजे तुमच्या शरीरातून सर्व अतिरिक्त द्राव काढून टाकल्याक्षणी तुमच्या ‘प्रायमरी केअर फिजिशियन’नी नोंदवलेले तुमचे वजन. ‘डायलिसिस’च्या प्रक्रियेदरम्यान तुम्ही ‘ऑब्जेक्टिव्ह’ वजनाच्या किती जवळ आहात, ते समजण्यासाठी उपचार सुरू करताना तुमचे वजन तपासले जाते. म्हणूनच आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार द्रवपदार्थांचे सेवन केल्याने हे ‘ऑब्जेक्टिव्ह’ वजन अपेक्षित पातळीहून खूप अधिक भरणार नाही. ‘हिमोडायलिसिस’च्या रुग्णांमध्ये द्रवाचे प्रमाण शरीराच्या वजनाच्या सुमारे तीन टक्क्यांपर्यंत वाढलेले सरसकटपणे दिसून येते.
 
 
तुमची आहारपद्धती योग्यप्रकारे काम करत आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी रक्ततपासण्या करून घेणे ही सर्वाधिक आदर्श पद्धती आहे. दर महिन्याला केलेल्या रक्तचाचण्यांमुळे तुमच्या डॉक्टरांना तुमच्या रक्तातील लोहाची कमतरता, खनिजांच्या पातळीतील समतोल, प्रथिनं टिकून राहण्याचे प्रमाण आणि ‘डायलिसिस’ पुरेशा प्रमाणात होत आहे किंवा नाही या सार्‍याचे एकत्रच मूल्यमापन करता येईल.
 

- डॉ. कमलेश एन. पारिख
(लेखक एमडी, डीएनबी (नेफ्रोलॉजी), नेफ्रोप्लस श्रीनाथ क्लिनिक, नेफ्रोलॉजिस्ट आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@