नागवंशी कान्होजी जेधे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2020
Total Views |
Kanoji_1  H x W
 


‘शिंदे’ हे उपनाम कसे निर्माण झाले? त्यांची व्युत्पत्ती कशी झाली असावी? ह्या विचाराने इतिहास वाचन सुरु केले त्यावेळी लक्षात आले की, महाराष्ट्रात असलेली ९६ कुळे त्यातील ४ कुळे दक्षिण भागातून आलेली आहेत व शिंदे हे घराणे नागवंशीय असून ते एक प्राचीन परंपरा सांगणारे घराणे आहे.
 
 
असताना मला कर्कोटक, शेष (अनंतनाग), वासुकी, तक्षक, कालिया, पिंगळा इत्यादी नागवंशीय राजे हिंदूस्थानच्या वायव्य भागात राज्य करत होते व नंतर ते हिंदूस्थानच्या दक्षिण भागात स्थिरावलेले दिसतात. कधीकाळी हा नागवंश राजवंश म्हणून कार्यरत होता. याच नाग राजवंशातील एक प्रमुख घराणे म्हणजे ग्वाल्हेरचे शिंदे घराणे. आपल्या नागवंशाचे प्रतीक म्हणून त्यांनी त्यांच्या नाण्यांवर आणि ध्वजावर नागाचे चिन्ह वापरले आहे.
 
नागवंशाच्या उल्लेखाने शिवकालीन कागदपत्रे अभ्यासताना माझ्या वाचनात कान्होजी जेधे यांच्याबद्दलची माहिती आली. किल्ले राजगडावरील बालेकिल्ल्यातील ‘दिवाण-ए-खास’ सदरेवर अफजल भेटीपूर्वी कान्होजी जेधे व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली. त्यावेळी कान्होजी जेध्यांनी स्वराज्यकार्यास्तव आपल्या वतनावर पाणी सोडले, त्या घटनेची साक्ष त्या सदरेवरील चिर्‍यांमधील ओलावा आजही देत आहे. पुढे अफजल प्रसंगानंतर जेधे घराण्याने दाखवलेल्या पाठिंब्याने, धैर्याने प्रेरित होऊन शिवरायांनी त्यांचा सन्मान केला होता. पावनखिंडी संग्रामानंतर महाराजांनी तो मान बांदलांना दिला. असो, जेधे घराण्याविषयी मी अजून अभ्यास करून माहिती मिळवणायचा प्रयत्न करत आहे. कारण, हे घराणे त्यागमय जीवनाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
 
 
इसवी सन १६१३-१४ कान्होजी नाईक जेधे देशमुख भोर (‘देशमुख’ हा शब्द त्या गावाचा राजा या अर्थी वापरला जातो) असून मौजे कारी हा गाव कान्होजी यांच्या अधिपत्याखाली होता. ते सांगतात, “तो गाव आम्ही व आमचे वडिलांनी हशम लोक (पायदळाचे लोक) आमचे तर्फेचे आमचे वडिलांचे व आमचे उपयोगी पडून कारीची देशमुखी मिळवून दिली. त्याबद्दल हशम यांनी इमान प्रमाण श्रीरायरेश्वर देवाजवळ क्रिया हिंदूधर्माची होऊन कारी तर्फ मजकुराचे गावगन्नापैकी देशमुखी वतनाबद्दल निमे हक पूलबाब असा करार झाला. देशमुखीचे वतन दिवाणातून मिळाले दिलेल्या वाचनप्रमाणे हशम लोकांस गावगन्ना निम्मे वतन द्यावे तरी वतनाचा बखेडा होतो.
 
 
याचकरिता सारे हशम लोक आमचे तर्फेचे जमा होऊन त्यांची समजूत काढली. ती अशी की, सारे लोकांचे सदर हु मौजे कारी हा गाव आमचे इसापतीचा होता, सारे लोकांनी समजावे. ह्याजवरून सारे हशम लोक प्रभू बाबाजी व फडणीससुद्धा राजी होऊनि कारि गाव घेतला. ते वेळी आमचे वडिलांनी व आम्ही ठरविले की आम्ही आपले एक घर बांधून तेथे राहू ह्याचे कारण आमचे जीव हशम लोकांनी आजवर वाचविले. तैसे पुढेही वाचविले पाहिजे, यांकरिता एक घर आम्ही बांधून राहू. आमची चाकरी हशम लोकांनी शिरस्ते प्रमाणे तारेवरची करून आम्हांस सांभाळावे. कारी मजकुरीचे शेते, तळे, वाटा व गाऊ रानांत व डोंगरचे माथा पाटस आसामदाराचे मिराशी शेतात वैगरे जागी आम्ही व आमचे वंशी शेते करणार नाही. शेते करू तरी आम्हांस व आमचे वंशास शपथ ‘श्रीनागोबा’ची असे.”
 
 
वरील पत्रातील नोंदीवरून जेधे घराणे हेही नागवंशीय होते का? नाग राजवंशासी संबंधित असल्याने त्यांनी ‘श्रीनागोबा’ अशी शपथ घेतली असेन काय? याचा मागोवा अभ्यासाअंती घेता येईल. मी इतिहासाची विद्यार्थिनी आहे, मला जे कागदपत्र मिळाले, त्याद्वारे मी माझे मत व शंका प्रदर्शित केली आहे. त्यामध्ये कोणाच्याही भावना दुखावणे हा हेतू नाही तरी ह्या लेखाचा इतिहास अभ्यास म्हणून विचार व्हावा, असे मला वाटते. तरी त्यातून अधिक-उणे वाटल्यास क्षमस्व.
 
 
- श्रिया शिंदे ७२०८३१५०४५
@@AUTHORINFO_V1@@