भाजपाचे महाएल्गार आंदोलन सुरु

    दिनांक  01-Aug-2020 11:22:16
|

mahaelgar_1  Hमुंबई : दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच दूध दर वाढीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारनं एक बैठक बोलावली होती. त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने १ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाने महाएल्गार राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्ष भाजपसह काही शेतकरी संघटना आज पहाटेपासून रस्त्यावर उतरल्या असून ठिकठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. गावागावात कार्यकर्ते दूध संकलन केंद्रावर जाऊन दूध घालण्यास विरोध करत आहेराज्यातील औरंगाबाद, जालना, अमरावती, सांगली, अकोला, पंढरपूर, पुणे आदी भागात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या दूध आंदोलनामध्ये महायुतीमधील घटक पक्षही सहभागी झाले आहेत. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी इस्लामपूर शहरात दुधाची गाडी अडवून लोकांना दूध वाटले.तर अकोल्यात मध्यरात्रीपासूनच भाजपच्या दूध आंदोलनाला सुरूवात, मध्यरात्री दुधांच्या गाड्या अडवल्या. पहाटे ५ वाजेपासून शहरातील जठारपेठ चौकात आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन सुरू, दूध विक्री थांबवली.


नाशिक


दिंडोरीत खासदार भारती पवार दूध दरवाढीच्या आंदोलनात सहभागी, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, खासदार भारती पवार,आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचं आंदोलन. तिथं गावच्या चावडीवरील दगडाला घातला दुग्धाभिषेक.


सांगली

महायुतीच्या दूध आंदोलनाची पहिली ठिणगी सांगली जिल्ह्यामध्ये रात्री पडली. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आष्टा आणि तासगाव याठिकाणी दुध वाहतूक रोखत दूध रस्त्यावर ओतले आहे. यावेळी दुधाचा एक टँकर फोडण्यात आला. दूध दरवाढीच्या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या माध्यमातून १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली होती. इस्लामपूर शहरात दूधगाड्या अडवून गरीबांना दूध वाटण्यात आले.


औरंगाबाद

दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून राज्यभर शेतकरी आंदोलन करत आहे.औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील डोनगाव मध्येही दूध उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलन केले. सरकारमध्ये असलेल्या तीन पक्षांच्या नावाची फलक लावत,दगड ठेवून प्रतिकात्मक आंदोलन केले. सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून गावातील गणपती मंदिरात दुग्धाभिषेक केला.


सोलापूर


भाजपा आणि रयत्न क्रांती शेतकरी संघटना व इतर घटक पक्षाच्या वतीने वाघोली ता. मोहोळ येथे दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दुधाचा दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या सरकारला सद्बुद्धी येऊ दे असे साकडे घालत महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक घालूनआंदोलनाला सुरुवात झाली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.