पोलीस दलातील जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू

    दिनांक  30-Jul-2020 21:45:52
|

Police_1  H x W
 
अंबरनाथ : पोलीस दलात कार्यरत असलेल्या जुळ्या भावांचा आठ दिवसांच्या फरकाने कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथला घडली आहे. दिलीप रामचंद्र घोडके आणि जयसिंग रामचंद्र घोडके या जुळे भाऊ असलेल्या पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिलीप घोडके हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हवालदार होते, तर जयसिंग घोडके अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार होते.
 
 
हे दोघेही भाऊ एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते, एकत्र ट्रेनिंग पूर्ण केले होते. दिलीप घोडके यांचा २० जुलै, तर जयसिंग यांचा २८ जुलै रोजी मृत्यू झाला, यामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. राज्यात तब्बल ८ हजार ९५८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील ६ हजार ९६२ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर ९८ पोलिसांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेला आहे. या परिस्थितीतमुळे पोलिसांवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.