'त्या' नराधमाला अद्दल घडवा : देवेंद्र फडणवीस

    दिनांक  10-Feb-2020 11:32:21

Devendra Fadanvis_1 
 
 
मुंबई : सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी हिंगणघाट पीडितेने नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. यावेळी नागरिकांसहित संपूर्ण महाराष्ट्राने आक्रोश व्यक्त केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील 'त्या नराधमाला अद्दल घडली पाहिजे', अशी मागणी सरकारकडे केली आहे. तसेच, त्याला कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.
 
 
 
 
 
"हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेतील पीडितेला अखेर आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती मिळावी, यासाठी मी प्रार्थना करतो." असे म्हणत त्यांनी पीडितेला श्रद्धांजली वाहिली.
 
 
 
तर, "ती आपल्यातून निघून गेली असली तरी तिच्या मारेकर्या्ला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी अद्दल त्याला घडली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारकडे आहे." असा आक्रोशदेखील ट्विट करत व्यक्त केला.