'आरे' काय हे? 'न्हावाशेवा'साठी ९४६ झाडांच्या मुळावर कुऱ्हाड

    02-Dec-2020
Total Views | 142

MMRDA_1  H x W:
 
 


शिवडीतील न्हावाशेवा प्रकल्पासाठी ९४६ झाडांचा बळी जाणार

मुंबई : शिवडीतील न्हावाशेवा प्रकल्पासाठी ९४६ झाडांचा बळी जाणार आहे. तर सॅन्डहर्स्ट रोड येथील हॅकॉक पुल आणि महालक्ष्मी येथील दोन उड्डाण पुलांच्या कामासाठी २८८ झाडांची कत्तल होणार आहे. बुधवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत एकूण १ हजार २३४ झाडे कापणे व पुनरोपित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
 
 
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शिवडी न्हावाशेवा प्रकल्प राबवला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई - न्हावाशेवा अंतर काही मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. परंतु शिवडी न्हावाशेवा मार्गातील अनेक झाडे प्रकल्पात अडथळा ठरत आहे. त्यामुळे या भागातील ४२० झाडे कापणे व ५२६ झाडे पुन:रोपित करण्याची परवानगी एमएमआरडीएने मुंबई महापालिका प्रशासनाकडे मागितली होती. बुधवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली.
 
 
मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ता मोकळा मिळावा यासाठी महालक्ष्मी स्थानक येथे दोन पूल उभारण्यात येणार आहेत. या पुलाच्या कामात अडथळा ठरणारी १७५ झाडे कापणे व ८१ पुन:रोपित करण्यात येणार आहेत. तर सॅन्डहर्स्ट रोड येथील हॅकॉक पुलाच्या कामात अडथळा ठरणारी २० झाडे कापणे व १२ झाडे पुन:रोपित करण्याची परवानगी या बैठकीत दिली आहे.
 
 
आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास विलंब
 
आरे आंदोलन प्रकरणात २९ जणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रीया अजूनही रखडलेली आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी प्रातिनिधिक आंदोलकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. गेल्या वर्षी २ डिसेंबरला यासंदर्भातील समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र, त्यानंतर वर्ष संपत आले तरी सामान्य विद्यार्थी, महिला, पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्यावरील गुन्हे कायम आहेत. आरे आंदोलकांच्या दैनंदिन अडचणींमध्ये वाढ होत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आंदोलकांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121