कल्याणमध्ये आंदोलनाच्या दणक्याने शाळेचे शुल्कमाफ

    दिनांक  16-Oct-2020 18:34:08
|
Kalyan School_1 &nbsकल्याण : कल्याण पूर्वेतील साई इंग्लीश स्कूलने विद्याथ्र्याची शालेय फी भरण्यासाठी पालकांना सक्ती केली होती. या सक्तीच्या विरोधात पालकांनी आज शाळेत धाव घेतली. पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात चर्चा झाल्यावर शाळेने विद्याथ्र्याची शालेय शुल्क ३५ टक्के कमी करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.
 
 
 
साई इंग्लीश स्कूलकडून पालकांकडे विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यासाठी सक्ती केली जात होती. पालकांनी याप्रकरणी स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे तक्रार केली. नगरसेवक गायकवाड यांच्यासह पालकांनी शुक्रवारी शाळा व्यवस्थापनाची भेट घेतली. शाळेकडून विद्याथ्र्याचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी टॅब, मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप खरेदी करावा लागतो. तसेच इंटरनेटचा खर्च वेगळा होतो. या ऑनलाईन शिक्षणाचा भरुन दंड पालकांना सहन करावा लागत आहे.
 
 
लॉकडाऊनमुळे पालकांच्या हाताला काम नाही. अनेक पालकांचे रोजगार गेले आहेत. अनेक पालकांच्या पगारात कपात झाली आहे. त्यामुळे मुलांचे शुल्क ते कशी काय भरणार असा सवाल पालकांनी शाळा व्यवस्थापनांकडे उपस्थित केला. पालकांनी शाळेकडे ५० टक्के फी कमी करण्याची मागणी केली होती. ही मागणी नगरसेवक गायकवाड यांनी शाळा व्यवस्थापनाच्या संचालक मंडळातील पदाधिका:यांसमोर मांडली.
 
 
यावेळी संचालक मंडळातील गौतमी मैथिली, गौतम घायवट, एम. जे. राठोड, ममता चक्र वती यांच्यासोबत चर्चा केली. शाळेने ५० टक्के फी कमी करणो शक्य नसल्याचे सांगितले. अखेरीस प्रदीर्घ चर्चे अंती शाळेने ३५ टक्के शुल्क कमी करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. शाळा एका विद्याथ्र्याकडून वर्षाकाठी १३ हजार ३०० रुपये फी घेते. आता ३५ टक्के शुल्क माफ झाल्याने पालकांना केवळ नऊ हजार रुपयेच शुल्क भरावे लागणार आहे.
 
 
 
शाळेच्या संचालिका गौतम मैथीली यांनी सांगितले की, नगरसेवक व पालकांची मागणी विचारात घेऊन शाळेने ३५ टक्के शुल्क माफ केली आहे. शाळा व्यवस्थापनाला शाळेच्या देखभाल दुरुस्तीची खर्च असतो. त्याचबरोबर शिक्षकांच्या पगाराचा खर्च आहे. त्यामुळे शाळा देखील आर्थिक अडचणीत आहे. मात्न पालकांची आर्थिक अडचण विचारात घेता ३५ टक्के शुल्क कमी केले आहे.   
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.