शुन्य कचरा मोहिमेतून अशीही समाजसेवा

    05-Feb-2019
Total Views | 56


कल्याण : येथील टीम परिवर्तनच्या माध्यमातून वंचितांची गरज पूर्ण करण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शुन्य कचरा संकलन मोहीमेच्या माध्यमातून महिन्यातुन एकदा अनुक्रमे कल्याण आणि डोंबिवली शहरांतील नागरिकांकडून त्यांच्याकडे असलेले जूने साहित्य संकलित केले जाते.

 

जूने कपडे, खेळणी, शैक्षणिक साहित्य, बॅग, इलेक्ट्रॉनिक वस्तु, प्लास्टिक, चपला आणि बूट मोठ्या प्रमाणात या मोहिमेत जमा होत असतात. जमलेल्या साहित्याची वयोगट आणि आकारानुसार विभागणी केली जाते आणि दुर्गम भागांतील गरजू लोकांना हे साहित्य वाटले जाते. नुकतेच या मोहिमेच्या माध्यमाने जमा झालेले साहित्य वांगणी आणि टिटवाळा जवळील शेलुगाव आदिवासी पाडा, आधारवाडी बांधिवली, गोवेळी ठाकुरपाडा, कोलम, चौरा, पोई येथे वाटप करण्यात आले.

 

कैलास आणि सुखदा देशपांडे यांच्या पुढाकाराने चालणारी ही मोहीम गेल्या दीड वर्षापासुन सुरू आहे. या मोहिमेत जमा झालेल्या प्लास्टिकच्या वस्तू पूर्नवापरासाठी पुण्यात पाठवण्यात येतात तर कपड्यांच्या कापडी पिशव्या बनवल्या जातात. इतर उपयोगात नसलेल्या कापडापासून विविध उपयोगी वस्तू बनवल्या जातात. या मोहिमेच्या माध्यमाने जमा होणारे साहित्य विविध सामाजिक संस्थांना दिले जाते नुकतेच कल्याणच्या टीम परिवर्तनच्या माध्यमाने जमा झालेले साहित्य वांगणी आणि टिटवाळा येथील दुर्गम आदिवासी पाड्यात वाटण्यात आले.

 

नागरिकांनी आपल्याकडील जुने साहित्य त्याचबरोबर प्लास्टिकच्या कचऱ्याचे योग्य नियोजन करावे पर्यावरणपुरक जीवनशैली अमलात आणावी यांसाठी कल्याण शून्य कचरा संकलन मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेच्या माध्यमाने जमा होणारे साहित्य अनेकांना उपयोगी ठरत आहे शैक्षणिक साहित्य आणि कपड्यामुळे अनेकांच्या गरजा पुर्ण होत आहेत टीम परिवर्तन हा आमचा युवकांचा गट यापुढेही अनेक गरजु वस्ती पाड्यात ही वाटप मोहीम चालु ठेवणार आहे युवकांनी या सहभागी होण्याचे आवाहनही यावेळीं टीम परिवर्तनच्या अनिकेत बारापात्रे याने केले.

 

भुषण राजेशिर्के, तुषार वारंग, गुंजन महाजन, अनिकेत बारापात्रे, भुषण बाजीराव, कौस्तुभ धार्मिक, अविनाश पाटील, अंजुम मुलानी, रुपाली वाघुडें या युवकांनी यावेळीं मोहिमेत सहभाग नोंदवला. आजही आपल्या आजूबाजूला असलेली अनेक पाड्यात मुलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत आम्हीं युवक मुंबई ठाणे परिसरात युवकांचे आणि संस्था संघटनांचे एक व्यासपीठ तयार करून हे काम करण्याचा प्रयत्न यापुढें करणार आहोत यांसाठी आम्हांला संपर्क करावा असे टीम परिवर्तनचे अविनाश पाटील या युवकाने यावेळीं सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
पाक उच्चायुक्तालयातील दानिश निघाला ISI एजंट! गद्दारांकडून पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात मागवायचा भारतीय सिमकार्ड

पाक उच्चायुक्तालयातील दानिश निघाला ISI एजंट! गद्दारांकडून पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात मागवायचा भारतीय सिमकार्ड

(Pakistani High Commission official Danish was an ISI agent) ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारताने देशाअंतर्गत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या घरभेद्यांचा शोध सुरु केला. यामध्ये गेल्या आठवड्यात, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह वेगवेगळ्या राज्यांमधून अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे सगळे पाकिस्तानी उच्चायुक्तालयात अधिकारी असणाऱ्या आणि आयएसआय एजंट एहसान उर रहीम उर्फ ​​दानिश आणि मुझम्मिल हुसेन उर्फ ​​सॅम हाश्मी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या आरोपींना अटक केल्यानंतर, आयएसआय एजंट दानिश आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121