मोबाईल वापरामुळे लागला चष्मा, आता लग्न जमेना !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2019
Total Views |
WEDDING _1  H x
 

मुंबई : जन्मपत्रिका, कुंडली योग, अंकशास्त्र व करियर यासोबतच आता दृष्टीदोष हा एक महत्वाचा अडथळा ठरत आहे. भारतातील सुप्रसिद्ध नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या पनवेल व खारघर येथील लक्ष्मी आय इन्स्टिटयूटतर्फे गेल्या वर्षभरात केलेल्या एका निरीक्षणात लग्न न जुळण्यासाठी कमजोर नजर म्हणजेच दृष्टीदोष हे महत्वाचे कारण समोर आले आहे.

 

याविषयी अधिक माहिती देताना रिफ्रॅक्टिव्ह शल्यचिकित्सक व नेत्रतज्ञ डॉ. तन्वी हळदीपूरकर म्हणाल्या, " गेल्या दहा वर्षात डिजिटल युग झपाट्याने वाढले आहे, आजची युवा पिढी दिवसातील कमीत कमी ७ ते ८ तास वेगवगळ्या स्क्रीनवर ( मोबाईल , कॉम्पुटर, लॅपटॉप, गेम गॅझेट, किंडल ) वेळ घालवत असल्यामुळे अनेक तरुण तरुणीना डोळ्यांच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. जाड भिंगाचा चष्मा, सतत बदलत राहणारा चष्म्याचा नंबर, कॉन्टॅक्ट लेन्सचा सततचा वापर, अतिरिक्त कामामुळे डोळ्यात वाढणारे दृष्टीदोष याचे प्रमाण गेल्या दहा वर्षात वाढले आहे.

 

वयाच्या वीस वर्षांपासून आजची युवा पिढी ही स्वतः ला कामामध्ये झोकून देते व वयाच्या पंचविशी अथवा तिशीपर्यत म्हणजेच लग्नाच्या वयात आल्यावर दृष्टीदोष अधिक ठळक होतात. अनेक मुलींची चष्मा नसणाऱ्या मुलाला पसंती असते त्याचप्रकारे मुलांची सुद्धा हीच मागणी असते. गेल्या वर्षभरात आमच्याकडे रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीमध्ये (चष्माचा नंबर घालविण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी ) वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. आमच्या पाहणीत चष्मेधारक मुलींच्या पालकांमध्ये जास्त चिंता दिसून येते कारण लग्न जुळविताना चष्मा असणाऱ्या अथवा कॉन्टॅक्ट लेन्सचा सतत वापर करीत असलेल्या मुलींना अनेकवेळा नकार मिळतो व त्यामुळे मुलींचे पालक अधिक चिंतेत असतात."
 

सानपाडा येथे राहणारी निमिषा वेदपाठक ( नाव बदललेले आहे ) यांचे लग्न ठरलेले असून यांनी नुकतीच आपल्या डोळ्यांवर रेफ्रेक्टिव्ह सर्जरी करून घेतली आहे कारण त्यांच्या नवऱ्याला ऍडव्हेंचर टूर म्हणजेच साहसी ट्रीप्सची आवड असून लग्नानंतर निमिषाला त्यात सहभाग घेण्यासाठी चष्माचा अथवा कॉन्टॅक्ट लेन्सचा अडथळा होणार नाही. याची दुसरी बाजू सांगताना डॉ. तन्वी हळदीपूरकर म्हणाल्या , आधुनिक बैठी जीवनशैली व चष्मा यांचे नाते अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे, सिंगापूर व जपान येथे झालेल्या पाहणीमध्ये युवापिढीमध्ये चष्मा असल्याचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे.

 

घरात राहून बैठे खेळ खेळणे, स्क्रीन व कॉम्पुटरवर जास्त वेळ घालवणे अशा शहरी जीवनशैलीचा विपरीत परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होत आहे. पालेभाज्या अथवा गाजर खाले तर डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते हा एक मोठा गैरसमज भारतामध्ये दिसून येतो. चष्मा सतत वापरला तर नंबर लवकर जातो हा सुद्धा एक गैरसमज आहे , चष्मा वापरणे व नंबर कमी जास्त होणे या दोन स्वतंत्र बाबी आहेत. सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे व आकर्षक लग्नपत्रिका, पंचतारांकित लग्न सोहळा, हळदीचा भव्य सोहळा अशा अनेक विधींमध्ये वधू व वराकडची मंडळी निसंकोचपणे खर्च करीत असतात व आता या खर्चासोबतच चष्मा घालविण्यासाठी अथवा नंबर कमी करण्यासाठी अनेक पालक वैद्यकीय मदत घेत असल्याची माहिती लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटतर्फे देण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@