महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यशवंतराव चव्हाण यांना संयुक्त महाराष्ट्र आंदोलनानंतर राज्यात मंगल कलश आणण्याचे श्रेय दिले जाते. वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले. पण, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात विकासाच्या मंगल कार्यांचा प्रसार झाला, त्याचे श्रेय जर कुणाला द्यायचे असेल, तर ते सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकासाला अभूतपूर्व गती दिली आहे. आज टेस्ला सारखी गाडी जेव्हा भारतात दाखल होते, तेव्हा या गाडीच्या स्वागतासाठी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो सर्वप्रथम झळकतो. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र परदेशी थेट गुंतवणूक मिळवणारे सर्वांत मोठे राज्य ठरले आहे.
मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र उद्योग-व्यवसायाच्या बाबतीतही सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात अनेक असे प्रकल्प पूर्णत्वास गेले, जे दशकानुदशके रखडलेले होते. उदाहरणार्थ, मुंबई आणि न्हावा-शेवा यांना जोडणारा ङ्गअटल सेतू.फ 1964 साली याची कल्पना मांडण्यात आली होती आणि तब्बल सहा दशकांनी या न्हावा-शेवा सी लिंक प्रकल्पाला मंजुरी, याची अंमलबजावणी व उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच शक्य झाले.
त्याचप्रमाणे मुंबई कोस्टल रोडफची संकल्पना वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री काळात मांडण्यात आली होती. 1952 सालापासून ही योजना केवळ कागदावरच होती. विधानसभा व विधान परिषदेत अनेक वेळा या योजनेबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले. फडणवीस यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात या कोस्टल रोड प्रकल्पाचा शिलान्यास केला आणि त्यांच्या कार्यकाळातच त्याचे उद्घाटनही झाले.
दोन मोठे प्रकल्प विशेष उल्लेखनीय आहेत: मुंबई मेट्रोची संकल्पना आणि 1970च्या दशकात सुरू झालेली बॉम्बे अर्बन टाऊन प्लॅनिंग योजना. मेट्रोच्या केवळ एका टप्प्याचे कामच काही प्रमाणात सुरू झाले होते. मात्र, मेट्रो लाईन-2,मेट्रो लाईन सिव्हिलफ आणि ङ्गमेट्रो लाईन-3फ यांसारख्या अनेक कॉरिडोरच्या मंजुरीपासून उद्घाटनापर्यंतचा प्रवास फडणवीस यांच्या कार्यकाळातच पूर्ण झाला. पण, 2019 ते 2022 या काळात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली. मेट्रो-3 च्या कारशेडविषयक वादाच्या नावाखाली या योजना बंद करण्यात आल्या.
फडणवीस पुन्हा सरकारमध्ये आल्यावर या प्रकल्पांना पुन्हा गती मिळाली. मुंबईच नव्हे, नागपूर मेट्रोचा शुभारंभही त्यांच्याच कार्यकाळात झाला. ठाण्यासह इतर अनेक शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प सुरू आहेत. फडणवीस मुख्यमंत्री होण्यापूर्वी विदर्भाचा विकास कायमच दुर्लक्षित राहिला होता, त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरत होती. पण, मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी समृद्धी महामार्गफ ही संकल्पना राबविली आणि त्यांच्या कार्यकाळातच 700 किमी लांबचा एक्सप्रेस-वे प्रत्यक्षात उतरवला. आता नागपूर ते मुंबई हे अंतर फक्त काही तासांमध्ये पार करता येते. हा महामार्ग केवळ प्रवास नाही, तर मुंबईच्या हृदयाला नागपूरच्या हृदयाशी जोडणारी जीवनवाहिनी ठरला आहे.
गडचिरोलीसारख्या नक्षलप्रभावित भागात विकासाच्या योजना पोहोचविण्याचे कार्यही देवेंद्र फडणवीस यांनीच केले. ग्रामीण आणि शहरी रस्त्यांचे आमूलाग्र परिवर्तन त्यांच्या कार्यकाळात झाले. ङ्गप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंफतर्गत त्यांनी एवढे मोठे लक्ष केंद्रित केले की, आज महाराष्ट्रातील बहुतेक गावं रस्त्यांच्या जाळ्याने जोडली गेली आहेत.
महाराष्ट्राला कायमच दुष्काळाचा जबरदस्त फटका बसत असे. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 11 हजार गावांना जलयुक्त शिवार अभियानाशी जोडून जलसंपत्ती वृद्धिंगत करणारा हा प्रकल्प यशस्वी केला. यामुळे मोठ्या प्रमाणावर दुष्काळमुक्ती शक्य झाली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाफ या कर्जमाफी योजनेद्वारे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला.
ज्याप्रकारे नरेंद्र मोदी यांनी ङ्गमेक इन इंडियाफ अभियान राबविले, त्याचप्रमाणे फडणवीस यांनी ङ्गमेक इन महाराष्ट्रफ या संकल्पनेला बळ दिले. यामुळे फॉक्सकॉनफसारख्या मोठ्या कंपन्या महाराष्ट्राकडे आकर्षित झाल्या. पण, फडणवीस यांच्यानंतर आलेल्या उद्धव ठाकरे सरकारच्या काळात या कंपन्यांचे प्रकल्प थांबले.
मॅग्नेटिक महाराष्ट्रफसारख्या शिखर संमेलनांद्वारे कोट्यवधी रुपयांचे सामंजस्य करार फडणवीस यांच्या नेतृत्वात साकार झाले. दावोससारख्या जागतिक व्यासपीठावर फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी जगभरातून गुंतवणूक आकर्षित केली. पुणे, ठाणे, नागपूर हे देशातील सर्वोत्तम स्मार्ट सिटीज म्हणून उदयाला आले, त्यांचेही श्रेय फडणवीस यांनाच जाते.
मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांबरोबरच, त्यांनी गावांनाही सुविधा दिल्या. त्यामुळे महाराष्ट्राचे संपूर्ण जीवनमान उंचावले. महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट बहुमत देऊन हा संदेश दिला की, आता केवळ विकास करणारे, ठोस निर्णय घेणारे आणि सकारात्मक राजकारण करणारेच यशस्वी होणार आहेत.