प्रगतिशील महाराष्ट्राचे शिल्पकार : देवेंद्र फडणवीस

    21-Jul-2025
Total Views | 4

आज देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दूरदृष्टी, कार्यक्षम निर्णयक्षमता आणि निष्ठावान नेतृत्वाचे प्रतीक ठरलेले, महाराष्ट्राचे जनप्रिय मुख्यमंत्री आणि माझ्या आयुष्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. या विशेष दिनानिमित्त त्यांच्याबद्दल कृतज्ञतेने गौरव व्यक्त करणे, हे माझे कर्तव्य आहे. माझ्या आयुष्यात देवेंद्रजी यांचे स्थान फार मोठे आहे. ते माझे गुरू आहेत. माझ्या सार्वजनिक जीवनातील आदर्श आहेत.

देवेंद्रजी राजकीय जीवनात अतिशय तरुण वयातच सक्रिय झाले. नागपूरचे महापौर म्हणून त्यांच्या कार्यकाळातच त्यांच्यातील नेतृत्वगुण सर्वांसमोर आले. त्यानंतर आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय परिवर्तनात मोलाचे योगदान दिले आहे.

त्यांच्या नेतृत्वात राज्याने ‘समृद्धी महामार्ग’ हा आशियातील एक महत्त्वाकांक्षी रस्ता प्रकल्प उभारला. ‘मेट्रो योजना’, ‘जलयुक्त शिवार अभियान’, ‘शेतकरी कर्जमाफी’, ‘उद्योगमित्र धोरण’, ‘बुलेट ट्रेन’सारख्या उच्चदृष्टीच्या योजना यांमधून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने प्रभावी पावले उचलली.

आज त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र चौफेर दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. जगातील अनेक प्रख्यात कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. गुंतवणुकीचा ओघ वेगाने वाढत आहे.

देवेंद्रजींच्या कार्यशैलीतील पारदर्शकता, निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेली थेट नाळ ही अनेक नव्या नेत्यांसाठी आदर्श ठरते. राजकारणात प्रामाणिकपणा व संयमाचे दर्शन देणारे फडणवीस हे राजकारणातील आधुनिक व्यवस्थापन कौशल्याचे उदाहरण ठरतात.

व्यक्तिगत आयुष्यात ते स्वच्छ, नम्र, सुसंस्कृत आणि सर्व कार्यकर्त्यांशी आपुलकीने वागणारे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनाही नवी प्रेरणा व ऊर्जा मिळते.

देवेंद्रजींचे चाहते केवळ भाजपमध्येच नाही, तर सर्वच राजकीय पक्षांत आहेत. देवेंद्रजींकडे लोकांची कामे घेऊन आलेल्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींची कामे तातडीने होतात. राजकीय मतभेद बाजूला ठेवून देवेंद्रजी त्यांना मदत करतात. त्यांच्यावर आरोप करणार्यांना ते मोठ्या मनाने माफ करतात. त्यांच्या मनात कुणाबद्दलही द्वेष नसतो.

समाजातील शेवटच्या माणसाचे कल्याण व्हावे, हे देवेंद्रजींच्या आयुष्याचे ध्येय आहे. ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’च्या माध्यमातून लाखो रुग्णांना त्यांनी केलेली मदत या राज्यातील गरीब माणसाच्या आयुष्यात नवे जीवन निर्माण करणारी आहे. ही मदत देवेंद्रजींच्या मनातील तळमळीतून येते.

देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय कार्य आणि दूरदृष्टी ही केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण देशाच्या विकास दृष्टिकोनात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात राज्याने जेवढी प्रगती केली, ती भविष्यातील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरेल.

आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत अशा कणखर, दूरदृष्टी संपन्न आणि अभ्यासू नेतृत्वाची अत्यंत गरज आहे. नव्या पिढीने देवेंद्रजींच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करावा आणि ‘राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर सेवा आणि दायित्व’ हे लक्षात ठेवून पुढे यावे, हेच या वाढदिवसाचे खरे प्रेरणादायी बंधन ठरेल.

या आनंदाच्या दिनी त्यांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आदरणीय देवेंद्रजी, आपल्या दीर्घायुष्याला, उत्तम आरोग्यास आणि पुढील वाटचालीतील यशस्वीतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्राच्या प्रगतीच्या यात्रेत आपण असेच अग्रभागी राहा, ही मनापासून सदिच्छा!

डॉ. परिणय फुके, आमदार, महाराष्ट्र विधान परिषद

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121