पंढरपूर कॉरिडॉरचे काम तीन महिन्यांत सुरू करणार!

    31-Mar-2025
Total Views | 14
 
Pandharpur Corridor work begin in three months Devendra Fadanvis
 
पंढरपूर: ( Pandharpur Corridor work begin in three months Devendra Fadanvis ) “पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्वांना विश्वासात घेऊन करणार असून पुढील तीन महिन्यांत जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. २९ मार्च रोजी केली.
 
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरण बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मागच्या काळात पंढरपूरमध्ये मंदिराचे काम सुरू केले असून अतिशय चांगल्या प्रकारे हे काम सुरू आहे. यातील जास्तीत जास्त काम आषाढीच्या आधी पूर्ण करू शकू, तर काही काम आषाढीनंतरही होईल. याव्यतिरिक्त कॉरिडॉरच्या कामाचाही आराखडा तयार केला आहे.
 
यासाठी जमीन संपादन करावी लागेल. लोकांना विस्थापित न करता त्यांना सरकारकडून योग्य मोबदला दिला जाईल. ज्यांची दुकाने आहेत, त्यांना दुकाने देण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात एक चांगला आराखडा तयार केला आहे. लोकप्रतिनिधी आणि त्या भागातील लोकांशी या आराखड्यावर चर्चा करून आपण त्यांना काय देणार आहोत, हे सांगा, अशा सूचना मी दिल्या आहेत. पुढील तीन महिन्यांत जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.
 
प्रत्येक गोष्टीत वाद योग्य नाही
 
रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “याबाबत सगळ्यांशी चर्चा करावी लागेल. शेवटी त्याकरिता होळकरांनी पैसे दिलेले आहेत. त्यामुळे तो असा कसा काढून टाकणार, याबाबत मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष आहे. इतकी वर्षे झाली त्याठिकाणी वाघ्याचा पुतळा किंवा समाधी आहे. त्यामुळे या प्रकरणात सगळ्यांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे, असे काही आहे का? त्यामुळे वाद करण्याचे काहीही कारण नाही.”  
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121